education year postponed start late in balgam holiday also decreased in belgaum 
कोल्हापूर

आगामी शैक्षणिक वर्ष जुलैनंतर ; सुट्ट्यांचे प्रमाणही होणार कमी ?

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शाळा वेळेत सुरू न झाल्याचा फटका २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षाला बसणार आहे. पुढील वर्षी दोन महिने विलंबाने म्हणजे जुलै किंवा ऑगस्टदरम्यान शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्षात सुट्यांचे प्रमाण कमी करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत शिक्षण खाते विचार करीत आहे.

कोरोनामुळे यंदा मार्चपासून बंद झालेल्या शाळा अद्यापही सुरू करता आलेल्या नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दहावी व बारावीचे वर्ग जानेवारीत सुरु करण्याबाबत चर्चा सुरु आहे. दहावीचे वर्ग सुरू झाल्यावर येणाऱ्या काळात कशी परिस्थिती निर्माण होणार आहे, यावर शाळांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तसेच गेल्यावर्षीप्रमाणे विनापरीक्षा उत्तीर्ण न करता यावेळी काही महिने शाळा भरवून परीक्षा घ्यावी, असे मत व्यक्‍त होत आहे.

जानेवारी महिन्यात शाळा सुरु झाल्या तरी दहावी व बारावीच्या परीक्षेला अधिक विलंब होणार आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट जाऊन परिस्थिती पूर्वपदावर आली तरी मेअखेर शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्याची शक्‍यता नाही, याची जाणीव शिक्षण खात्याला आहे. त्यामुळेच २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष अद्याप पूर्ण झालेले नसतानाच पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब होईल, असे मत शिक्षणाधिकाऱ्यांतून व्यक्‍त होत आहे. महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे पुढील महिन्यात नववी ते बारावीचे वर्ग भरवतानाही अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 

"दहावी परीक्षेला विलंब झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षही विलंबाने सुरू होण्याची शक्‍यता आहे. मात्र, सध्या शिक्षण खात्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षावर लक्ष केंद्रीत केले. जानेवारीत नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय लवरकच घेतला जाणार आहे."

- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT