कोल्हापूर

तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीमध्ये १० ते १३ जून दरम्यान ''शैक्षणिक क्षमता विकास प्रशिक्षण'' कार्यशाळा-

CD

कोरे मिलिटरी अकॅडमीत उद्यापासून
क्षमता विकास प्रशिक्षण कार्यशाळा

वारणानगर, ता. ८: येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी येथे १० ते १२ जूनदरम्यान तीनदिवसीय शिक्षक क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. टी. कलाधरण यांनी दिली.
शिक्षकांसाठी बदलत्या शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार क्षमता विकास करणे तसेच कौशल्य व ज्ञान वाढवण्यासाठी व उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यास सक्षम बनविण्यासाठी शिक्षकांसाठी तीन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर व कार्यशाळा होईल. यात नावीन्यपूर्ण शिकविण्याच्या पद्धती, आगामी पिढीमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याविषयी शिक्षण संस्थांची भूमिका वर्ग व्यवस्थापन व तंत्र शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, विद्यार्थी मूल्यांकन व मूल्यमापन, विद्यार्थ्यांचा भावनिक आणि सामाजिक विकास या विषयांवर चर्चा होणार आहे. प्रशिक्षणात वारणा परिसरातील शंभर शिक्षक सहभागी होणार आहेत. सुस्मिता मोहंती, डॉ. शोभा कुंभार, डॉ. देवेंद्रसिंग यादव, डॉ. किरण पाटील, डॉ. व्ही. व्ही. कार्जनी, अमेय महेश साखरे, डॉ. दिनेश सातपुते, माहेश्वरी चौगुले व प्राचार्य डॉ.प्रकाश कुंभार यांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही. कार्जनी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यावेळी तात्यासाहेब कोरे मिलिटरी ॲकॅडमी चे टी. बी. ऱ्हाटवळ, प्रशांत जाधव, डी. ए. मुजावर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Case : दिल्ली ब्लास्टच्या आधीचा आरोपी डॉ. उमरचा धक्कादायक व्हिडीओ समोर...आत्मघाती हल्ल्याबाबत काय म्हणाला होता?

लग्न होईना, चौघींनी बहिणीच्याच १६ दिवसांच्या लेकराला संपवलं; पाय मोडले, गळा दाबून पायाखाली चिरडलं, धक्कादायक व्हिडीओ समोर

Latest Marathi Breaking News : पुणे महानगरपालिकेत बायोमॅट्रीक हजेरी सक्तीची, नोंदणी करण्याचे आदेश

Navale Bridge Accident: अपघातातील कंटेनर तपासणीत अडचणी; ब्रेक फेल की चालकाचे नियंत्रण सुटले? अहवालानंतरच स्पष्ट होणार

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT