educational policy for schools declared by government in kolhapur 
कोल्हापूर

शैक्षणिक वर्षासंदर्भात शासनाने धोरण जाहीर करावे; कृती समितीची मागणी

संदीप खांडेकर

कोल्हापूर : यंदा पहिली ते चौथीचे वर्ग सुरू न झाल्याने त्या संदर्भात अंतिम निर्णय काय असेल, यासह अन्य विषयांवर शासनाने शैक्षणिक धोरण जाहीर करावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना आज देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे देश लॉकडाऊन होता. त्याचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात असल्यामुळे देशाचे जनजीवन विस्कळीत झाले. शैक्षणिक क्षेत्रही मार्च २०२० पासून बंद आहे. नवीन शैक्षणिक वर्ष जून २०२० ला चालू झाले व ते एप्रिल २०२१ मध्ये संपत आहे. 

त्यामुळे पालक, नागरिक व विद्यार्थी या शैक्षणिक वर्षाबद्दल अनभिज्ञ आहेत. शासनाच्या शिक्षण विभागाने त्या अनुषंगाने त्वरीत स्पष्टीकरण करावे. यावेळी नवीन शैक्षणिक वर्षात पाचवी ते दहावीच्या वर्गासाठी कंम्प्लसरी गडकोट किल्यांवर शैक्षणिक सहलींचे आयोजन करुन छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहिती करुन द्यावा. शालेय सहलींसाठी काही अतिशय जाचक व अडचणींच्या अटी आहेत. त्या रद्द किंवा कमी करुन शाळांना सहली काढण्यास प्रोत्साहन द्यावे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा क्रीडांगणावर सामुदायिक मासपेटीचा तास घ्यावा. त्यात नेहमीच्या कवायतीप्रमाणे शिवकालीन युध्दकलेचे प्रशिक्षण (लाठी काठी) देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना करण्यात आल्या. या प्रसंगी सहायक संचालक सुभाष चौगुले, शिक्षण निरीक्षक डी. एस. पवार उपस्थित होते. शिष्टमंडळात रमेश मोरे, अशोक पोवार, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, पंपू सुर्वे, लहुजी शिंदे, कादर मलबारी, विनोद डुणूंग, चंद्रकांत सूर्यवंशी, रणजित पवार यांचा समावेश होता.

कृती समितीचे प्रश्न असे :

  • इयत्ता पाचवी ते नववीचे वर्ग फेब्रुवारी २०२१ ला सुरु झाल्याने या वर्गाच्या परिक्षा होणार की,
  • विद्यार्थ्यांना प्रमोट करणार?
  • बालवाडी ते इयत्ता चौथीचे वर्ग चालू झालेले नाहीत. तरीही काही शाळांनी वर्षाची शालेय फी मागणी करुन पालकांकडून वसूल केली आहे. याबाबत शासनाची भुमिका काय ?
  • पुढील शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२२ जून असेल. त्याबाबत नेमके काय नियोजन असणार?
     

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT