कोल्हापूर : कोरोनाचे संकट दूर होताना पुन्हा शेतीमाल व औद्योगिक माल वाहतुक जोर धरू लागली आहे. तरीही किसान रेल्वेने पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नच करावे लागणार आहेत.
परराज्यात शेतीमाल, औद्योगिक माल वाहतुकीसाठी ट्रकचा वापर केला जातो. मात्र या वाहतुकीसाठी जाणारा वेळ, इंधन, रस्त्यावरील धोके पाहता अशी माल वाहतूक करणे अनेकदा अवघड होते. यावर पयार्य म्हणून मध्य रेल्वेने किसान रेल्वे सेवा सुरू केली. गतवर्षी मोठ्या दिमाखात सुरू झालेल्या सेवेमुळे कोल्हापूर परिसरातील औद्योगिक मालांची वाहतुक सुरू झाली. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेच्या माल वाहतुकीचे भाडे तुलनेने कमी होते. त्यामुळे येथील आटोमोबाईल सुटे भाग, इचलकरंजीचे सुत, कापड यापासून ते साखर, खत आदी मालाची वाहतुक होऊ लागली . येथील बहुतांशी माल कोलकत्ता, चेन्नई, विजयवाडा, मुंबई, हैदराबाद आदी राज्य व शहरात माल पाठवला गेला. सुरूवातीला बरा प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद आणखी वाढावा किसान रेल्वेच्या जादा फेऱ्या व्हाव्यात, यासाठी किसान रेल्वेतून माल वाहतूक करावी. याची माहिती देण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी येथील उद्योजक, व्यापारी संघटना, कंपन्या, सूतगिरण्या तसेच बाजार समिती आदी घटकांची भेट घेऊन रेल्वेच्या माल वाहतुकीसाठी किसान रेल्वेचा लाभ घेण्याची विनंती केली. त्यानंतर मालांचा ओघ सुरू झाला.
याच काळात गेल्या मार्चमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन झाला याकाळात बहुतांशी औद्योगिक कारखाने बंद राहीले. कामगार वर्ग परगावी गेला. यात उत्पादन प्रक्रिया घटली. व्यापार उद्योगात मंदी आली. परिणामी माल वाहतुकीवर मर्यादा आल्या.
माल वाहतूक पुन्हा सुरू होऊ शकते
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून साखर पोती, शेतीमाल , औद्योगिक माल वाहतूक करता येणे शक्य आहे. रस्ते वाहतुकीचा खर्च पाहता किसान रेल्वे वाहतूक परवडणारी सुरक्षीत वाहतुक आहे. त्यासाठी येथील शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांनी आपल्याकडील माल किसान रेल्वेने पाठविण्याची खात्री दिल्यास ही सेवा पुन्हा सुरू होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.