Eggplant, Tomato Grower Farmers In Trouble Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वांगी, टोमॅटोचा वाहतूक खर्चही भागेना 

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील भाजीमंडईत गेल्या महिनाभरापासून टोमॅटो, वांग्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीपेक्षा आवक जास्त झाल्याने घाऊक बाजारात दर गडगडले आहेत. टोमॅटोला पाच, तर वांग्याला केवळ 10 रुपये किलोला भाव आहे. सध्या मिळणारा दर नेहमीच्या तुलनेत निम्याहून कमी आहे. त्यामुळे या दरात काढणी, वाहतूक खर्चही भागेना झाला आहे. बियाणे, औषधे, मजुरी यासाठी केलेली गुंतवणूक तरी किमान मिळावी यासाठी नाईलाजाने शेतकरी उत्पादने बाजारात आणत आहेत. परिणामी, टोमॅटो, वांगी उत्पादक अडचणीत आला आहे. 

येथील भाजीमंडई पुर्वी लगतच्या सीमाभागातून येणाऱ्याया भाजीपाल्यावरच अंवलबुन होती. मात्र, गेल्या दोन दशकात या परिसरात झालेल्या पाटबंधारे प्रकल्पामुळे भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढला. मुख्यतः रोज मिळणारा ताज्या पैशामुळे भाजीपाला उत्पादकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. हिरण्यकेशी नदीकाठच्या गावात भाजीपाला घेणारे शेतकरी आहेत. स्थानिक गरज भागवून येथुन रोज कोकण, गोवा याठिकाणी भाजीपाला पाठविला जातो. रोज सकाळी बाजार समितीच्या आवारात सौदे होतात. 

वांगी हे दोन महिन्याने येणारे पिक आहे. विशिष्ट चवीमुळे पांढऱ्या वांग्याना मागणी अधिक आहे. साहजिकच या जातीच्या वांग्याचे रोपांचे दर तेजीत असतात. वांगी आणि टोमॅटोच्या एका रोपाची किंमत सरासरी एक रुपये आहे. दीड महिन्यापुर्वी 200 ते 300 रुपये असणाऱ्या वांग्याचा दर आवक वाढल्याने 100 रूपयावर घसरला. त्यात हुमणी, पांढरी माशी या रोगांनी उत्पादनांवर परिणाम झाला आहे तो वेगळा. टोमॅटोला फळधारणा दीड ते दोन महिन्याने होते. सरासरी किमान आठ रुपये दर मिळाला तरच उत्पादकाच्या घामाला दाम मिळतो. पंरतु, सध्या मिळणाऱ्या दरात ओढाताण करण्याची वेळ आली आहे. 

तग धरून आहे
या हंगामात टोमॅटोचा दराने निचांक गाठला. दरातील चढउतार असले तरी शेतकऱ्यांनी उत्पादनात सातत्य ठेवायला हवे. शेतीतील सर्वच कामे कुटूंबातील सदस्य करत असल्याने दर कमी होऊनही तग धरुन आहे. 
- प्रशांत कोरी, टोमॅटो उत्पादक, औरनाळ 

भुर्दंड सोसण्याची वेळ
बियाणे, औषधे, काढणी, वाहतूक यांचा मेळ घातला तर वांग्याला किमान किलोला 15 ते 20 रुपये दर मिळायला हवा. प्रत्यक्षात 10 रुपये दर मिळत असल्याने भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे. 
- सुभाष जाधव, वांगी उत्पादक, मुगळी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : सनातन हिंदू धर्मात वराह जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व- नितेश राणे

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT