Eight Employees Of Gadhinglaj Municipal Are Corona Positive Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज पालिका "लॉकडाऊन', आठ कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरात कोरोनाला रोखण्यासाठी राबणाऱ्या हातांनाच कोरोनाची लागण झाल्याने पालिकेवर अखेर आजपासून लॉकडाऊनची वेळ आली आहे. पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला. चार दिवस पालिकेचे कामकाज बंद राहणार असल्याने कामे ठप्प होणार आहेत. 

शहरात मे महिन्यात एकही रूग्ण नव्हता. जूनमध्ये ही संख्या चारवर पोहचली. जुलैपासून आजअखेर रूग्णांचा आलेख उंचावतच आहे. सुरूवातीपासून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी परिश्रम घेतले. पालिकेने राबवलेल्या उपाययोजनांना पहिल्यांदा यशही आले. परंतु, जुलैपासून वाढती रूग्णसंख्या कमी यायला तयार नाही.

सध्या, तर रोज दहा ते बारा रूग्णांचा आढळ होत आहे. कोरोनाच्या कामात सर्व विभागप्रमुखांसह आरोग्य कर्मचारी गुंतले आहेत. सुरूवातीच्या काळात पालिकेत कोरोनाचा शिरकाव नव्हता. परंतु, गेल्या आठवड्यात मुख्याधिकारी आणि एक कर्मचारी पॉझीटीव्ह आले. त्यानंतर बहुतांशी विभागप्रमुखांना कोरोनाची लागण झाली. आज ही संख्या आठवर पोहोचली आहे. यामुळे इतर कर्मचाऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे. 

शहरवासियांना सेवा देण्यासाठी पालिकेचे कामकाज नियमित सुरू आहे. लॉकडाऊन काळातही कार्यालय सुरू होते. आता पालिका कर्मचाऱ्यांनाच कोरोनाने गाठल्याने धास्ती वाढली आहे. यामध्ये बहुतांशी विभागप्रमुखांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पालिका कार्यालय वरचेवर सॅनिटायझेशन केले जात आहे. आजपासून चार दिवस आता कार्यालय बंद राहणार आहे.

बाहेरील कोणत्याही नागरिकांना आत प्रवेश दिला जात नाही. काही अत्यावश्‍यक कर्मचारीच पालिकेत आज आले होते. परंतु, सेवा बंद आहे. नागरिकांना पालिकेच्या माध्यमातून संसर्ग होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून कामानिमित्त येणारे नागरिक परत जात आहेत. वाढत्या रूग्णसंख्येमुळे चार दिवस कार्यालय लॉकडाऊन करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsath Video: पैशाने भरलेली बॅग अन् हातात ग्लास घेऊन बेडवर बसले; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Ujani Dam: 'उजनी धरणात ११४ टीएमसी पाणीसाठा'; २० हजार क्युसेकची आवक, भीमा नदीत सोडला १६ हजारांचा विसर्ग

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT