eight handred twanty four people are quarantined in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 181 परराज्यातील 643

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 181 आणि परराज्यातील 643 अशा एकूण 824 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील  20 परराज्यातील 6 अशा 26 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 20 परराज्यातील 9 अशा 29 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 8 परराज्यातील 11  असे एकूण 19 असून याची क्षमता 25 जणांची आहे.

करवीर - सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील 2 परराज्यातील 35 एकूण 37 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी - राज्यातील 9, परराज्यातील 39 असे एकूण 48 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.   

कागल - जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 36 परराज्यातील 200 असे एकूण 236 जण असून क्षमता 250 जणांची आहे.

हातकणंगले - घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील 2 परराज्यातील 85 असे एकूण 87 जण असून क्षमता 100 जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 104 असे एकूण 106 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 42 परराज्यातील 8 एकूण 50 जण असून क्षमता 55 जणांची आहे. 

शिरोळ - शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 13 परराज्यातील 17 असे एकूण 30 क्षमता 50 आहे. जैन सांस्कृतिक भवन कुरूंदवाड येथे परराज्यातील 4 एकूण 4 क्षमता 50 आहे. उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे परराज्यातील 27 एकूण 27 क्षमता 50 आहे.

गडहिंग्लज - देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील 9 परराज्यातील 1 एकूण 10 असून क्षमता 24 जणांची आहे.

गगनबावडा - माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यातील 13 जण असून क्षमता 20 जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97 असे एकूण 102 असून क्षमता 105 जणांची आहे.

यामध्ये...

  • कर्नाटकातील 245,
  • तामिळनाडूमधील 208
  • राजस्थानमधील 88
  • मध्यप्रदेशमधील 47
  • उत्तर प्रदेशमधील 31
  • केरळमधील 8
  • पाँडेचरीमधील 1
  • पश्चिम बंगालमधील 1
  • आंध्रप्रदेश  5
  • झारखंड  5
  • बिहार 2
  • हरियाणा 4

अशा एकूण 12 राज्यातील 643 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 181 असे मिळून 824 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT