Eight people were bitten by a stray dog ​​in Ganeshwadi 
कोल्हापूर

पिसाळलेल्या कुत्र्याचा गणेशवाडीत आठ जणांना चावा

सकाळवृत्तसेवा

कसबा बीड : गणेशवाडी (ता. करवीर) येथे आज सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचा चावा घेतला. त्यानंतर शेजारील केकतवाडीतही काही जणांचा चावा घेतला. 
सकाळी सात वाजता पिसाळलेले कुत्रे भावेश्‍वरी मंदिराच्या गल्लीत घुसले. तेथे दिलीप माने, शामराव एकल यांचा त्याने चावा घेतला.

त्यानंतर पांडुरंग माने व त्यांची पत्नी शीतल यांचा जोरात चावा घेतला. वाटेत नामदेव लाड यांच्या गाईचा चावा घेऊन वैरणीस गेलेले संभाजी नरके व हरिबा लाड यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर शेतात काम करणाऱ्या छाया रानगे व शांताबाई एकल यांचा चावा घेतला. कुत्र्याने धनगराच्या कळपातील दोन कुत्र्यांचा व एका मेंढीचा चावा घेतला. त्यानंतर कुत्रे केकतवाडीत घुसले. तेथे बाजीराव बळी नलवडे यांचा चावा घेतला. तसेच धोंडेवाडी येथील शिवाजी नलवडे यांच्या गाईचा चावा घेतला.

दरम्यान, जखमींवर शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्यापासून ग्रामस्थांनी सावध राहावे, असे आवाहन गणेशवाडीचे सरपंच व कुंभी कारखान्याचे संचालक दादासाहेब लाड यांनी केले आहे. यावेळी तलाठी एन. पी. पाटील, आरोग्य सेवक आनंदा बाटे, पोलिसपाटील धनश्री मेढे, पंढरीनाथ ताशिलदार, प्रकाश तिबीले, सुरेश दुर्गुळे, तंटामुक्तचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते. 

कुत्रे चावण्याच्या घटना घडतच असतात. लोकांनी घाबरून न जाता तातडीने चावा घेतलेली जागा स्वच्छ पाण्याच्या नळाखाली किमान दहा मिनिटे साबणाने धुवावी. जखम उघडी किंवा बांधून ठेवू नये. प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन लसीकरण करून घ्यावे. 
- डॉ. मधुरा मोरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोली दुमाला. 

कोल्हापूर 

कोल्हापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT