eight policemen from the same police station were infected with corona in belgum
eight policemen from the same police station were infected with corona in belgum 
कोल्हापूर

बेळगावात एकाच ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोनाची लागण 

अमृत वेताळ

बेळगाव - वाहतूक दक्षिण पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवार (ता.9) करण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमध्ये आठ पोलिसांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पोलीस खात्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून पोलीस ठाण्यात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली असून बाधित पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या कुटुंबीयासह संपर्कातील लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोना काळात वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर थांबून रात्रदिवस सेवा बजावली आहे. कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्‍टर आणि पोलिसांनाच कोरोनाची लागण होत असल्याने ही गंभीर बाब बनली आहे. यापुर्वी शहरासह जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाचा समुह संसर्ग देखील सुरु झाल्याचे यापुर्वीच आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. अलिकडेच खडेबाजार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांस कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसापुर्वी स्पष्ट झाले आहे. रविवार (ता.9) वाहतूक दक्षिण पोलीस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची काल रॅपिड चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी एका पोलीस उपनिक्षकासह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह येताच पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयासह संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून कालच पोलिस ठाण्यात सॅनिटायझरची फवारणी करुन निर्जतुंकीकरण करण्यात आले. पण, पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

वाहतूक दक्षिण पोलीस ठाण्यातील पोलिसांची काल रॅपीट टेस्ट करण्यात आली. त्यावेळी एका पोलीस उपनिरीक्षकासह आठ पोलिसांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस ठाणे व आवारात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. 
- श्री.निवस हंडा, निरीक्षक दक्षिण वाहतूक ठाणे
 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT