election of gokul five family in competition in kolhapur 
कोल्हापूर

‘गोकुळ’ सत्ताकारण; पाच कुटुंबांत रस्सीखेच, इच्छुकांची जोरदार तयारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, संघाच्या विद्यमान पाच संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींनी स्वतंत्रपणे सुरू केलेली तयारी चर्चेचा विषय ठरली आहे. या तयारीतून आपला दबावगट तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून जागा नाही मिळाली तरी ‘सन्मान’ मिळवण्याचा डाव आहे. 

संघाची निवडणूक महिनाभरात जाहीर होईल; पण महिनाभरापासून सत्तारूढ गटाच्या संचालकांबरोबरच विरोधकांनीही तालुकानिहाय संपर्क दौरे सुरू केले आहेत. सत्तारूढ गटाच्या जोडीला संघाचे प्रामाणिक सुपरवायझर आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक संस्था आणि ठरावदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. यात काही विद्यमान संचालकांच्या नातेवाईकांनीच तयारी सुरू आहे. 

ठराव दाखल करतानाच बंडाचा झेंडा फडकवलेले संचालक अरुण डोंगळे यांना त्यांचे पुतणे धीरज हे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. धीरज यांनी संपर्क सुरू केला असला तरी ते आमदार पी. एन. पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत, पी. एन. नेतृत्त्व करत असलेल्या भोगावती कारखान्यात ते संचालक आहेत. डोंगळे यांनी अलीकडेच पी. एन. यांची घेतलेली भेट आणि त्यांना दिलेले सर्वाधिक पाहता धीरज यांचे बंड पेल्यातील वादळ 
ठरण्याची शक्‍यता आहे. 

रणजितसिंह पाटील यांचे बंधू व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. संचालक अरुण नरके हे पुत्र चेतन यांना सत्तारूढ गटात घेण्यासाठी प्रयत्नशील असताना त्यांचे पुतणे व ‘कुंभी’ बॅंकेचे संचालक अजित यांनीही संपर्क मोहीम सुरू केली आहे. स्वीकृत संचालक रामराजे कुपेकर यांना चुलते बाळासाहेब यांनी घरातूनच आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. संघाचे संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या श्रीमती जयश्री या सत्तारूढ गटासोबत आहेत, पण आता त्यांचे पुत्र शशिकांत हे प्रयत्नशील असताना कै. चुयेकर यांचे नातू व शशिकांत यांचे भाचे सुयोग वाडकर यांनी या दोघांच्या विरोधात तयारी सुरू केल्याचे समजते. 

वाढलेल्या तीन जागा कळीचा मुद्दा 

‘गोकुळ’च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आमदार पी. एन. पाटील व हसन मुश्रीफ यांच्यात होणाऱ्या संभाव्य बैठकीत वाढीव तीन जागांवर चर्चा होईल. वाढलेल्या या तीन जागाच कोण कोणासोबत असेल, यासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. यातून तडजोड झाली तर प्रवीणसिंह यांचे बंड थंड होईल. इतरांचा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT