election of gokul interested candide racing in platform of election in kolhapur 
कोल्हापूर

गोकुळ रणांगण; दिग्गजांचा पत्ता कट झाल्याने इच्छुक उमेदवारांची जोरदार फिल्डिंग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या दिग्गजांचा छाननीतच पत्ता कट झाल्यानंतर दुसऱ्या फळीतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी नेत्यांबरोबरच त्यांचे जवळचे कार्यकर्ते व नातेवाईक यांच्या भेटी घेण्याबरोबरच संबंधितांकडून दबावाचे राजकारणही सुरू आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ गट विरोधात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी असा सामना आता जवळपास निश्‍चित आहे.

सत्तारूढ गटाचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व ज्येष्ठ संचालक अरुण नरके करत आहेत. सत्तारूढ गटाच्या तुलनेत विरोधी गटांकडे नेत्यांबरोबरच इच्छुकांचाही मोठा भरणा झाला आहे. त्यामुळे सत्तारूढ गटापेक्षा विरोधी गटातच उमेदवारी देताना नेत्यांची कसोटी लागणार आहे. अशा स्थितीत विरोधी आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. निवडणुकीच्या आणि उमेदवारीच्या स्पर्धेतूनही रिंगणाबाहेर गेलेल्यांत जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी, वसंतराव धुरे, मुकुंद देसाई, पी. जी. शिंदे, के. एस. चौगले, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, भारती डोंगळे. सौ. सुहासिनी प्रवीणसिंह पाटील-मुरगूडकर, अंजना रेडेकर, अजित शहापुरे, राजेंद्र सूर्यवंशी, यशवंत नांदेकर, माधुरी जांभळे आदींचा समावेश आहे. यात विरोधी आघाडीतून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता असलेल्यांची संख्या मोठी आहे. अशा दिग्गजांनाच छाननीचा फटका बसल्याने त्यांच्याऐवजी आपली वर्णी लावावी यासाठी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. 

सत्तारूढ आणि विरोधी पॅनेलचे बहुंताशी उमेदवार निश्‍चित आहेत. सत्तारूढ गटातून पाच विद्यमान संचालक विरोधी आघाडीकडे गेले आहेत, त्यांच्या रिक्त जागेसह वाढीव तीन जागांसाठी इच्छुकांनी श्री. महाडिक, पी. एन. यांच्याकडे आपले वजन वापरण्यास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे विरोधी आघाडीतील काही उमेदवार निश्‍चित आहेत; पण छाननीत अर्ज अवैध ठरलेल्यांच्या जागी आपली वर्णी लागावी यासाठी गठ्ठा मतदानाबरोबरच ठरावदारांचे शिष्टमंडळ घेऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भातील हालचाली अधिक गतिमान होतील. 

यांची उमेदवारी निश्‍चित

सत्तारूढ गटाकडून विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, चेतन नरके, विश्‍वास जाधव, सौ. अनुराधा पाटील, वसंत खाडे, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, अंबरिषसिंह घाटगे, दीपक पाटील यांची तर विरोधी आघाडीतून संचालक अरुण डोंगळे, विश्‍वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, अजित नरके, नाविद मुश्रीफ, आमदार राजेश पाटील किंवा त्यांच्या पत्नी सौ. सुश्‍मिता, रणजित के. पी. पाटील, अर्चना ए. वाय. पाटील, कर्णसिंह गायकवाड किंवा त्यांच्या मातोश्री माजी आमदार संजीवनी गायकवाड, माजी संचालक बाबासाहेब चौगले यांची उमेदवारी निश्‍चित समजली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईत पहिली लोकल दीड तास अडकली... मध्य रेल्वे सेवेत पुन्हा मोठा खोळंबा, अचानक पॉवर सप्लाय बंद!

Pune News: धायरीत जलवाहिनीच फोडली; बेकायदा नळजोड घेणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार

Pune News: आधुनिकीकरणाच्या मार्गावर पीएमपीचा प्रवास; तांत्रिक प्रयोग यशस्वी; बहुतांश बसचे संचलन वेळापत्रकानुसार

Pune News: करिअरच्या असंख्य संधींवर मार्गदर्शन; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

Pune News: प्रवासी ‘कोंडी’त पुणे रेल्वे स्थानकावर अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT