the election of primary teachers announced on 6 december in belgaum teachers also visit to others for election 
कोल्हापूर

गुरुजी निवडणूकीच्या फिव्हरमध्ये ; 6 डिसेंबरला होणार मतदान

मिलिंद देसाई

बेळगाव : प्राथमिक शिक्षक संघटनेची निवडणूक जाहीर झाल्याने शिक्षकांची धावपळ सुरू झाली असून येत्या गुरुवारपासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शिक्षकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. 

गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूकीची तयारी करणाऱ्या शिक्षकांनी  निवडणूकीची तयारी सुरू केली असून निवडणुकीला फक्त काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने जास्तीतजास्त शिक्षकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून होत आहे. 

बेळगाव तालुक्यात शिक्षकांची संख्या जास्त असून येथील 1300 शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरात मतदारांची संख्या 700 च्या घरात आहे. प्रत्येकी 50 शिक्षकांसाठी एका सभासदाची निवड होणार असून महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांसह शिक्षीकाही निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास तयार झाल्या असून सरकार मान्य शिक्षक संघटना असलेल्या प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पंच वार्षिक निवडणूकित आपली सत्ता यावी या करिता सत्ताधारी प्रगतीपर शिक्षक संघ आणि गुरू स्पंदन शिक्षक संघटनेकडुन जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 

तालुक्यात 30 जागांसाठी तर शहरात 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मंगळवारी सकाळ पासून  पॅनलतर्फे निवडणूकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिक्षकांची नावे अंतिम करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. दरवेळी निवडणूक अधिकारी म्हणून गट शिक्षणाधिकारी काम पहात होते मात्र यावेळी गट शिक्षणाधिकारी यांच्याऐवजी खाजगी संस्थेकडे निवडणूकीची जबाबदारी देण्यात आली असून सध्या शाळा बंद असल्यातरी गुरुजी मात्र निवडणूकीच्या फिव्हरमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

26 ते 28 नोव्हेंबर - अर्ज भरण्याची मुदत 

29 नोव्हेंबर - अर्ज मागे घेण्याची मुदत 

6 डिसेंबर - सकाळी 8.30 ते 4.30 मतदान 

5.30 वाजल्यापासून मतमोजणी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT