Elections for cooperatives in Panhala taluka are underway kolhapur 
कोल्हापूर

पन्हाळा तालुक्‍यात रंगणार राजकारणाचा फड....

सागर चौगले

माजगाव - ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या वर्षात पन्हाळा तालुक्‍यातील तब्बल २८४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक १४६ विकास सेवा संस्थांचा समावेश आहे. मात्र, सहकार कायद्यातील नवीन दुरुस्तीतील क्रियाशील व अक्रियाशील सभासदानुसार या निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीमुळे तालुक्‍यातील गावागावांत राजकारण ढवळून निघणार आहे.

तालुक्यात निवडणूकीचे वारे

सहकारी संस्थांचे ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या सहकार संस्थेशी जोडली आहे. त्यामुळे गावपातळीवरील राजकीय नेत्यांसाठी या संस्था राजकीय केंद्र बनल्या आहेत. सहकारी संस्था आपल्या गटाच्या ताब्यात असावी, यासाठी गावागावात राजकीय ईर्ष्या टोकाला गेलेली असते. वेगवेगळ्या पक्षांचे व गटाचे कार्यकर्ते यासाठी साम-दाम-दंड वापरून संस्था ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. सेवा संस्था, पतसंस्था, ग्राहक संस्था, बॅंका, पाणीपुरवठा, सेवक पतसंस्था, प्रक्रिया संस्था, सूतगिरण, साखर कारखाना या संस्थांत रणधुमाळी रंगणार आहे. यात प्रामुख्याने सेवा संस्थांचा समावेश आहे. सेवा संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिखर संस्था जिल्हा बॅंक, गोकुळ दूध संघ या महत्वपूर्ण सहकारी संस्थेला ठरावाद्वारे मतदान करण्याचा अधिकार असतो. तसेच ग्रामीण भागातील जवळपास सर्व ग्रामस्थ या सहकार संस्थेबरोबर जोडले गेलेले असतात.
पक्षांसह स्थानिक गट झाले सक्रिय तालुका, जिल्हा, राज्यपातळीवरच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या संस्थेतील सत्तेच्या चाव्या आपल्या गटाच्या ताब्यात रहाव्यात यासाठी जनसुराज्य शक्ती, शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी यासह स्थानिक गट सक्रिय झाले आहेत. 

निवडणुका पूर्वीच्या नियमानुसारच

नवीन कायद्यानुसार पाच वर्षांच्या कालखंडातील त्या सभासदाचे संस्थेतील व्यवहार, वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती राहणे गरजेचे आहे. नवीन सहकार कायद्याची अंमलबजावणी गेले दोन वर्षे सुरू झालेली आहे. यात काही सहकारी संस्थांनी त्याचा स्वीकार अद्याप केलेला नाही. यामुळे पाच वर्षांच्या माहितीचा आलेख पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे या निवडणुका पूर्वीच्या कायद्यानुसार होणार आहेत. 

नवीन सहकार कायद्यानुसार क्रियाशील सभासद मतदानासाठी पात्र राहणार होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते; पण यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या मर्जीतील अक्रियाशील सभासदही मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने हे हानीकारक ठरणार आहे.
- मधुकर घुंगरे, सभासद, 
विठ्ठल सेवा संस्था, माजगाव


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT