Light
Light  sakal
कोल्हापूर

Kolhapur : वीज पडून होणारी हानी टाळणे शक्य

- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : आकाशातून वीज पडून होणारी हानी टाळणे शक्य आहे, असा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांत २००९ ला झाला होता. मात्र आता ही यंत्रणा कालबाह्यही झाली आहे. आता ‘लाईटिंग अरेस्टर’ ही अद्यावत यंत्रणा तयार झाली असून त्याचा वापर झाल्यास वीज पडून होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. शासकीय आणि खासगी पातळीवर अशी यंत्रणा बसविणे सोपे आहे.

पाऊस आणि वीज केंव्हाही पडून मनुष्य, प्राण्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मालमत्तेही नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात २००९ ला करवीर, चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील काही गावात माळावर ही यंत्रणा बसविली होती. यंत्रणेत एकदा वीज पडली तर ती यंत्रणा जळून खाक होत होती. मात्र ती इतरत्र पडणार नाही याची खात्री होती. आता नव्याने तयार झालेल्या ‘लाईटिंग अरेस्टर’चा वापर सहज आणि सोपा झाला आहे. अनेक वेळा वीज पडली तरीही ती यंत्रणा बदलावी लागत नाही. यामुळे नुकसान टाळले जाते. पूर्वी केवळ माळावर अशी यंत्रणा बसविली जात होती. आता यंत्रणेसाठी अंदाजे दीड लाखांचा खर्च आहे. मात्र यामुळे मालमत्ता सुरक्षित राहू शकते. तसेच जीविताला धोका होत नाही, याची खात्री असल्याचे अभ्यासक सांगतात.

यंत्रणा अशी...

१० चौरस फुटांत यंत्रणा उभी करता येते

सात ते पंधरा दिवसांत ही यंत्रणा उभी राहते

दीड लाखांपर्यंत खर्च अपेक्षित

उंच इमारतीवर टॉवरसारखी यंत्रणा कार्यान्वीत होते

७५ ते १५० मीटर पर्यंतचे संरक्षण

वीज पडण्यापूर्वीच त्याचे नियंत्रण यंत्रणेद्वारे होते

प्रत्येक मोबाइल टॉवरवर लाईटिंग अरेस्टर असतो. तो सुस्थितीत आहे का? हे नाही याचीही पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे. किमान मोबाइल टॉवरवरील यंत्रणा सक्षम राहिली तर त्या आणि परिसरातील इमारतींची सुरक्षा वाढेल. ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणे यंत्रणा बसविण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी लाईटिंग अरेस्टरचा वापर मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही होत आहे. एकदा यंत्रणा उभी केली तर वीज पडल्यानंतरही ती बदलावी लागत नाही. मनुष्य, प्राण्यांसोबत मालमत्तेचेही नुकसान टाळणे शक्य आहे.

- नितीन ऐनापुरे, अभ्यासक, उत्पादक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT