The elephant came again, lost again ... 
कोल्हापूर

हत्ती आला पुन्हा, नुकसान करून गेला पुन्हा... 

सुनील कोंडुसकर

चंदगड : हेरे (ता. चंदगड) परिसरात हत्ती पुन्हा दाखल झाला असून ऊस, भात पिकाचे नुकसान केले आहे. ऐन रोप लावणीच्या हंगामातच हत्तीचे आगमन झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वन विभागाने हत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. 

चंदगड आणि आजरा तालुक्‍याच्या सीमा एकेकाला भिडल्या असून या दोन्ही तालुक्‍यांच्या पश्‍चिमेच्या भागात हत्तींचा वावर आहे. दोन हत्ती या विभागात कायमस्वरुपी ठाण मांडून आहेत. त्यांचे भ्रमण क्षेत्र निश्‍चित असले तरी कालावधी निश्‍चित नाही. दिड, दोन महिन्याच्या अवधीने ते या भागात फेरफटका मारतात.

दोन महिन्यापूर्वी खामदळे, खालसा गुडवळे परीसरात हत्तीचा वावर होता. त्यानंतर ते पुन्हा आजरा तालुक्‍याच्या हद्दीत परतले होते. काल रात्री खालसा गुडवळे येथील निळकंठ कृष्णा पाटील यांच्या ऊस पिकात हत्तीने धुडघूस घातला. सुमारे दोन गुंठ्यातील पिकाचे नुकसान केले. डॉ. जयदेव पाटील यांच्याही ऊस पिकाचे हत्तीने नुकसान केले. दरम्यान वन विभाग हत्तीच्या हालचालीवर पाळत ठेवून असून नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. 

दृष्टिक्षेप 
- हेरे परिसरात हत्तीचे पुन्हा आगमन 
- ऊस, भात पिकांचे नुकसान 
- दोन हत्ती कायमस्वरुपी ठाण मांडून 
- ऐन रोप लावणीच्या हंगामात हत्ती आल्याने शेतकरी धास्तावले 
- वन विभागाने कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी अजून थोडं थांबा! शेतकऱ्यांना दिलासा, पण प्रतीक्षा कायम; बावनकुळेंनी सांगितलं विलंबाचं खरं कारण

निर्मिती यांनी मकरंद अनासपुरेंकडून गिरवले मराठवाडी बोलीचे धडे ! सुपर डुपर सिनेमासाठी अभिनेत्रीची मेहनत

Latest Marathi News Live Update : कागदपत्रात खोडाखोड करून जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल

"लग्न कधी करणार ?" चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर ! "आई-बाबा.."

Redmi 15A स्मार्टफोन झाला लाँच! १३ हजारपेक्षा कमी किंमतीत दमदार बॅटरी; 32MP कॅमेरा अन् खूप काही, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT