eleven villages sealed on Belgaum border in Maharashtra 
कोल्हापूर

महाराष्ट्रातील बेळगाव सीमेवरील 'ती' अकरा गावे केली सील... 

सुनील कोंडुसकर

चंदगड - बेळगुंदी (जि. बेळगाव ) येथे कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील अकरा गावे आजपासून सील करण्यात आली. तहसीलदार विनोद रणावरे यांनी आपत्ती व्यवस्थापन तसेच साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार हा आदेश लागू केला. त्यानुसार या गावांतील प्रत्येक कुटुंबाची चौकशी, संशयितांना कोरंटाईन करणे आदी कारवाई सुरू झाली आहे.

तालुक्यातील शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, कोलिक, मळवीवाडी, हजगोळी, सरोळी, ढेकोळी, ढेकोळीवाडी, सुरुते, खालसा म्हाळुंगे आदी गावे बेळगाव शहराच्या सीमेवर आहेत. कर्नाटक सीमेवरील गावे सुद्धा मराठी भाषिक असून नातेसंबंध मोठ्या प्रमाणात आहेत. बेळगाव ही या सर्वच गावांसाठी जवळची आणि मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी या गावातील लोक बेळगावला ये-जा करीत असतात. बेळगुंदी हे गाव या गावांना लागूनच आहे. त्यामुळे तेथील कोरोना बाधितांच्या संपर्कातून प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी खबरदारी म्हणून आज ही सर्व गावे सील करण्यात आली. या गावातील कोणीही नागरिक गावातून बाहेर पडू शकणार नाही, शिवाय अन्य गावातील नागरिक या गावात प्रवेश करू शकणार नाहीत याचे नियोजन केले आहे.

दक्षता समिती कडून या गावातील जे नागरिक गेल्या पंधरा दिवसात बेळगुंदीला गेले होते, ते कोणाला भेटले होते, त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक संकलित केले जात आहेत. जे नागरिक रुग्णाच्या संपर्कात आले असतील त्यांनी तत्काळ आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेणे व कोरंटाईन होण्यास सांगितले जात आहे. संबंधितांना तुर्केवाडी येथील कोरंटाईन केंद्रात दाखल करण्याबाबत तहसीलदारांनी सूचित केले आहे. या प्रत्येक गावातून दक्षता समितीकडून तपासणी पूर्ण झाल्यावर कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा विचार करून या गावातील संचारबंदी किती दिवस ठेवायची हे निश्चित केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT