Eleventh admission process starts today, eleventh class from 9th December
Eleventh admission process starts today, eleventh class from 9th December 
कोल्हापूर

अकरावीची प्रवेश प्रक्रीया आजपासून,नऊ डिसेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरू

ओकांर ध्रर्माधिकारी

कोल्हापूर ः राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रीया रखडली होती. यावर राज्य शासनाने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज कोल्हापूर शहरस्तरीय अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेबाबत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात वर्ग करून गुणवत्ता यादी तयार करून बुधवारी (ता.2) प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावीचे वर्ग कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत नऊ डिसेंबरला सुरू होणार आहेत. 
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. 
गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाबाबतच्या ऑनलाईन तक्रारी घेण्यात येणार आहे. गुरूवारी (ता.3) व शुक्रवारी (ता. 4) तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला तक्रार करायची असल्यास त्याबाबतचा तक्रार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. इतर कोणत्याही पद्धतीने तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे देण्यात आली.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 
- शुक्रवार (ता. 27) पासून मंगळवार (ता. 1) पर्यंत निवड यादी तयार करणार 
-बुधवारी (ता. 2) www.dydekop.org या संकेतस्थळावर दुपारी तीन वाजता निवड यादी प्रसिद्ध 
- गुरूवार (ता.3) ते मंगळवार (ता. 8) पर्यंत निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित करावा. 
- प्रवेश निश्‍चितीनंतर बुधवारी (ता. 9) पासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत.

--

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT