Emphasis on cycling for the fitness of international athletes
Emphasis on cycling for the fitness of international athletes 
कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा फिटनेसचा 'हा' आहे नवा फंडा

सुयोग घाटगे

कोल्हापूर  :कामासाठी सायकल वापरणे ही आता मागे पडत जाऊन फिटनेससाठी सायकलींगचे महत्त्व वाढले आहे. स्वतःची फिटनेस राखण्यासाठी सध्या अनेक खेळाडू सायकलिंग कडे वळले आहेत. लॉकडाऊन च्या आधीपासूनच सायकलवरचे वाढलेल्या प्रेमाने लॉकडाऊन मध्ये वाढलेले पोट कमी कारण्यासाठी तसेच फिटनेस राखण्यासाठी सर्वाधिक पसंद मिळवली आहे

.
सायकल मध्ये सध्या अनेक बदल झाले असल्यामुळे हि सायकल सध्या फिटनेस प्रेमींसह इतर खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची पहिली पसंद झाली आहे. सध्या कामापासून ते स्पर्धांपर्यन्त या सायकलींचा वापर होऊ लागला आहे. सध्या फिटनेस बद्दलची जाणीव वाढल्यामुळे या सायकलींना पुन्हा सुवर्णकाळ येऊ लागला आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये तर सर्वच प्रकारचे खेळ बंद झाले आहेत. शिवाय खेळांच्या सरावावर देखील मर्यादा आल्या आहेत. असे असताना विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी सायकलिंगकडे आपला मोर्चा वळवला आहे. या मुळे फिटनेस सह शासनाने घालून दिलेल्या सोशल डिस्टंसिंग सारख्या इतर नियमांचे पालन करणे देखील सोपे झाले आहे. 


सोबतच आयर्नमॅन सारख्या स्पर्धांमुळे त्या सायकलचे महत्त्व वाढतेच आहे. शिवाय जिल्हा, राज्य, आणि राष्ट्रीय पातळीवर सायकलच्या अनेक स्पर्धा होत असतात. त्यामुळेच की काय शाळांमध्ये सायकल महत्त्वाचे ठरत आहे. अनेकांनी सायकलिंग हापर्याय स्वीकारत शेकडो किलोमीटरची रपेट करण्याचा निर्धार केला आहे. यातूनच जोतिबा, पन्हाळा, राष्ट्रीय महामार्ग , राधानगरी, गारगोटी याठिकाणीअनेक जण सायकलिंग साठी जात आहेत. सायकलिंग मुळे फिटनेस सह शारीरिक क्षमता वाढीचा फायदा असल्यामुळे अनेकांनी सायकल जवळ केली आहे. 


खेळ कोणताही असो फिटनेस सर्वच खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. लॉकडाऊन मध्ये सर्वाधिक परिणाम खेळाडूंच्या कार्यक्षमतेवर झाला आहे. स्वतःची कार्यक्षमता बळकट करण्यासाठी व्यायामाचा योग्य पर्यायाची निवड करणे आवश्‍यक असल्यामुळे सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. या मुळे अधिक फायदा होत आहे. 
श्रीधर निगडे( आंतराष्ट्रीय रग्बी खेळाडू )  

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT