employees comes from marathwada for cutting sugarcane in kolhapur diwali vacation 
कोल्हापूर

यंदाची दिवाळी उसाच्या फडावरच

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. यंदा कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात जास्त ऊस असल्याने कोयत्याला चांगला भाव मिळत आहे. परिसरात परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने अनेक छोटे शेतकरी, शेतमजूर आता कारखान्याचा रस्ता धरू लागले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून तांडे आणि वस्त्यांवरून हजारो मजूर दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांची दिवाळी उसाच्या फडावरच साजरी होणार आहे.

बीड, लातूर, उस्मानाबाद परिसरातून विविध जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी हजारो मजूर दाखल होत आहेत. मुकादमाकडून एकरकमी उचल घेवून उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी सुरू आहे. गेल्यावर्षी दोन महिने उशिराने गळीत हंगाम सुरू झाला होता. त्यामुळे मजुरांनी दसरा-दिवाळी घरीच साजरी केली होती. यंदा दसऱ्याला बॉयलर पेटून लगेच गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यामुळे कारखाना परिसर व माळराने मजुरांनी फुलून जात आहेत. यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने हंगाम जास्त दिवस चालून मजुरांना फायदा होणार आहे. यंदा कोयत्याची उचल एक ते दीडलाखापर्यंत वाढली आहे.

"यंदा परतीच्या पावसामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद या दुष्काळी पट्ट्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर उदरनिर्वाह करण्यासाठी लहान मुले व कुटुंबीयांना घेऊन ऊस तोडणीसाठी आलो आहोत."

- दीनानाथ चंदनशिवे, ऊस तोडणी मजूर, केज (जि. बीड)

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT