Employees in stress, travelers in the sun 
कोल्हापूर

कर्मचारी ताणात, प्रवासी उन्हात 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून कोल्हापूरात येणाऱ्यांचा ओघ कायम आहे. यातून सीपीआर रूग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्यांच्या रांगा कायम आहेत. आजवर 18 हजार व्यक्तींची तपासणी झाली आहे.

अशात मोजक्‍या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर तपासणीचा ताण येत आहे. तर दूर गावावरून आलेल्या प्रवाशांना तासन्‌तास रांगेत थांबणाऱ्या भुकेने व्याकूळ होण्याची वेळ येत आहे. अशात सीपीआर रूग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून येथे सुविधा देण्याची आवश्‍यकता आहे. 

गेल्या सात दिवसांपासून रोज किमान 300 ते 650 हून अधिक प्रवासी कोल्हापूरातील सीपीआर रूग्णालयात तपासणीला येतात. यात बहुतेकजण किणी टोलनाका किंवा कोगनोळी, सांगली फाटा मार्गे कोल्हापूरात आलेले असतात. सीपीआर रूग्णालयात त्यांची तपासणी होते. 

सीपीआरमध्ये आल्यानंतर केस पेपर तपासणीसाठी तीन शिप्टमध्ये जवळपास 25 वैद्यकीय कर्मचारी नियुक्त आहेत. यातही अनेकदा टेक्‍निशयन असलेल्या कर्मचाऱ्यांना नावनोंदणी घेणे, अमूक विभागात तपासणीसाठी पाठविणे अशी किरकोळ कामे करावी लागतात. वास्तविक या तंत्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा वापर उपचार सेवेतील कामासाठी होऊ शकला असता. मात्र सध्या फक्त सीपीआरमध्ये कोरोना तपासणी व उपचार सेवा असल्याने अनुभवी कर्मचारी केवळ नावनोंदणीत अडकून पडले आहेत. 
येथे दिवस रात्री गर्दी असते. या गर्दीतील लोक प्रवास करून आलेले असतात.

लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद, चहा गाडी बंद त्यामुळे खायला काही मिळत नाही, प्रवाशांसोबत असलेली व लहान मुले रडत असतात, वृद्धांना तासभर उभे राहणेही मुश्‍कील होते. मात्र, सीपीआरचे काम फक्त वैद्यकीय तपासणी व गरजेनुसार उपचार एवढेच असल्याने येथे येणाऱ्यांना किमान अल्पपोहार मिळत नाही तो देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने किमान येथे सोय करणे आवश्‍यक आहे. 
------ 
दृष्टीक्षेप ः 
- गेल्या 45 दिवसांत 18 हजार व्यक्तींची तपासणी
- 45 कर्मचाऱ्यांची पथक दिवस-रात्र राबत आहे. 
- काही दिवसापूर्वी 15 कर्मचारी व्कारंटाईन झाले होते. 
- यात 6 परिचारीकाचा 4 पुरूष कर्मचारी होते. 
- वरील सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आल्याने ते पुन्हा कामावर जात आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video

धडा वेगळे शीर करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अघोरी पूजेतून नरबळी असल्याची शंका

रॅडिसनची मोठी भरारी! २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्सचं लक्ष्य; ८० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी

मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद! ‘राष्ट्रभाषा’ प्रश्नावरून संताप उसळला; मराठी एकीकरण समिती आक्रमक

Child Marriage : मोहळाईत 16 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला; 112 हेल्पलाईन व पारध पोलिसांच्या तत्पर कारवाईने अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT