kolhapur sakal
कोल्हापूर

अभियंते पुन्हा ‘बेरोजगार’ ; सार्वजनिक बांधकामकडील कामे देण्यास टाळाटाळ

ऐनवेळी केवळ संबंधित तालुक्यातील अभियंत्यांनाच काम वाटप व्हावे, अशी भूमिका प्रशासनाने घेतली.

डॅनियल काळे

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना पारदर्शक पद्धतीने काम वाटप होऊन त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटावा, या शासनाच्या मुख्य हेतूला जिल्ह्यात हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. सुमारे एक कोटी ६५ लाख रुपयांची कामे बेरोजगार अभियंत्यांना देण्यास टाळाटाळ होत आहे. या कामांवर राजकीय लॉबीचा डोळा असून, बेरोजगारांच्या वाट्याचा रोजगारही काढून घेण्याचे षड्‌यंत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लॉटरी पद्धतीने काम वाटप होते. यासाठी वेबसाईटवर दहा दिवस आधी सूचना दिली जाते. मात्र कोरोनाकाळात निधीच्या कमतरतेमुळे दीड वर्षात केवळ १२ लोकांना १७.४५ लाख रुपये किमतीच्या कामांचे वाटप झाले आहे. परिणामी सुमारे ९९ टक्के नोंदणीकृत अभियंता कामापासून वंचित आहेत. गेल्या महिन्यात १३ सप्टेंबरला २१ कामांच्या वाटपासाठी संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध झाली होती; मात्र प्रशासकीय अडचणीचे कारण देत ही कामे अंतिमक्षणी रद्द केली.

या महिन्यात ११ ऑक्टोबरला १० कामांचे वाटप लॉटरी पद्धतीने होणार होते. ही सर्व कामे एकाच तालुक्यातील होती. यासाठी जिल्ह्यातील ६४ नोंदणीकृत अभियंते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपस्थित होते. मात्र ऐनवेळी केवळ संबंधित तालुक्यातील अभियंत्यांनाच काम वाटप व्हावे, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्याला जिल्ह्यातील इतर अभियंत्यांनी आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने विरोध केला. परिणामी ही कामे वाटपास तात्पुरती स्थगिती दिली.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कोणत्याही मदतीचे पॅकेज नको. हक्काचे काम मिळावे, हीच भूमिका आहे. शासकीय परिपत्रकाची पारदर्शकपणे अंमलबजावणी करून जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय मिळावा, ही मागणी आहे.

-अभिजित कदम, सुशिक्षित बेरोजगार अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Crisis : कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप! DK शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री? लिंगायत, दलित, OBC सह अल्पसंख्याक नेत्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ

Pakistan Defence Minister: ''आमचे पूर्वज हिंदूच, पाकिस्तानमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जातोय'' पाकच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

SRH vs RR: प्लॅन A, B किंवा C... वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी पॅट कमिन्स सज्ज; एलिमिनेटर आधी काय म्हणाला, वाचा

Ebola Virus: आफ्रिकेनंतर भारतातही इबोलाची धास्ती! काय आहे हा जीवघेणा व्हायरस, कोणती आहेत लक्षणं? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : शिवसैनिकांनी विधान परिषदेची मागणी करणे काही चुकीचे नाही : भरत गोगावले

SCROLL FOR NEXT