Entrepreneurs In Ichalkaranji Are Worried Due To Increase In Yarn Price Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

सूतदर वाढीमुळे इचलकरंजीत उद्योजक हवालदिल

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : गेली दीड महिना सूत दरात वाढ होत राहिल्यांने यंत्रमाग उद्योजक हवालदिल झाले आहेत. सूतदरातील वाढीमुळे उत्पादन खर्च वाढतच आहे. मात्र कापडाला दर व मागणी येत नसल्याने यंत्रमाग उद्योजक हैराण झाले आहेत. सूतदरातील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे यंत्रमाग उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

सातत्याने सूतदरात गेली दीड महिने वाढ होत आहे. सर्व प्रकारच्या सुताच्या काउंटमध्ये सरासरी प्रति किलो मागे 50 ते 70 रुपये इतकी वाढ झाली आहे. सूत खरेदी केल्याशिवाय यंत्रमाग कारखाना सुरू करता येत नाही. सूतदरातील वाढीमुळे उत्पादन खर्च वाढत आहे. तुलनेने कापडाला अपेक्षित दर व मागणी नाही. दिवाळीनंतर कापडाला मोठी मागणी येईल, अशी आशा होती. पण तशी परिस्थिती सध्या नसल्यामुळे यंत्रमाग उद्योजक हवालदिल झाले आहेत. 

सूतदरात घसरण होईल, अशी आशा यंत्रमाग उद्योजकांना होती. पण सूतदर वाढीमुळे यंत्रमाग उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. लॉकडाउनमुळे आगोदरच यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. आता कुठे घडी बसत असताना सूतदरवाढीमुळे यंत्रमाग उद्योजकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कारखाना बंद ठेवता येत नाही. त्यामुळे आर्थिक फटका सहन करून कारखाना सुरूच ठेवण्याची वेळ सध्या आली आहे. सध्या तरी सूतदर कधी स्थिर होणार, याकडे यंत्रमाग उद्योजकांचे लक्ष लागले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

Pimpri Chinchwad fire: पिंपरी-चिंचवड हादरले! भंगार गोदामातील भीषण आगीने परिसर धुराने व्यापला, ६० जवानांची शर्थ

Fifa World Cup 2026 : ९० मिनिटं, पुतळ्यासारखा उभा राहतो हा माणूस; कोण आहे Michel Nkuka Mboladinga? तो असं का करतो? Video

Kolhapur Water Lifting Ban : कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' नद्यांवरील पाणी उपसाबंदी अखेर शिथिल; जलसंपदा विभागाचा आदेश जारी

Tutari Express: तुतारीचं इंजिन बिघडलं, आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT