entry to the head office of Belgaum Municipal Corporation has started on Monday 
कोल्हापूर

बेळगाव महापालिकेत प्रवेश बंदी... पण का...?

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील प्रवेश बंदी निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी (ता.6) सुरू झाली आहे. अधिकारी व कर्मचारी वगळता कार्यालयात कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. महापालिकेशी संबंधित अर्ज किंवा तक्रार दाखल स्विकारण्यासाठी आवक-जावक विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळच एक कक्ष तयार करण्यात आला आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांशी संबंधित अर्जही तेथेच स्विकारले जाणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला त्या कक्षात जाता येणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे मुख्य कार्यालय आवारातील गर्दीच कमी झाली आहे. गेल्या महिनाभरापासून कामकाजाच्या दिवशी महापालिकेचे कार्यालय गजबजून जात होते. पण सोमवारी कार्यालय आवारात शुकशुकाट होता.

बेळगाव शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता शहरात सामूहीक संसर्ग सुरू झाल्याची भिती आरोग्य विभागातून व्यक्त होत आहे. त्यातच बेळगाव शहरातील विरभद्रनगर येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. शासकीय कार्यालयात दररोज नागरीकांची गर्दी होते. त्यातही बेळगाव महापालिकेत जास्त गर्दी होते. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून बेळगाव महापालिकेत प्रवेश करण्यास नागरीकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पण महापालिकेचे दैनंदिन कामकाज मात्र सुरूच राहणार आहे.

नागरीकांनी आपला अर्ज किंवा तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून संपर्क क्रमांक घेतला जात आहे. त्यांचे काम झाले की त्यांच्याशी पालिकेचे संबंधित कर्मचारी संपर्क साधतील व माहिती देतील. महापालिकेत जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी सर्वाधिक गर्दी होती. ही गर्दी टाळण्यासाठी अर्जही कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच घेतले जाणार आहेत. दाखले तयार झाले की संबधित अर्जदारांना त्याची माहिती दिली जाणार आहे. महापालिकेने हा कक्ष सुरू केला असला तरी नागरीकांची कामे निर्धारीत वेळेत खरेच होणार का? असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे. महापालिकेत आपली कामे घेवून जाणाऱ्या बेळगावकरांनी तेथील दप्तरदिरंगाईचा खूप वाईट अनुभव आहे. महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कामे होत नाहीत. त्यामुळे आता प्रवेशबंदीनंतर कामे कशी होणार? असा सवालही त्यानी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT