Environment Minister Aaditya Thackeray email by Dilip Desai 
कोल्हापूर

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिलीप देसाई यांनी केला थेट ई-मेल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पंचगंगा तसेच रंकाळा तलाव प्रदूषणाच्या पाहणीसाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरला भेट द्यावी, तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी ई-मेलद्वारे केली आहे.

रंकाळा तलाव तसेच पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी पर्यावरणीप्रेमींनी आंदोलने केली. न्यायालयात खटले दाखल केले. उच्च न्यायालय, हरित लवाद, उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी निर्देश देऊनही प्रदूषण रोखण्यात यश मिळाले नाही. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध शासकीय स्तरावर तक्रारी दाखल केल्या. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री विषय केला. त्यावर कार्यवाही केली नाही. वातानुकूलित खोलीत बसून प्रदूषणाबाबत चर्चा करू नका, प्रत्यक्ष प्रदूषण होत असलेल्या ठिकाणी भेट देऊन निर्णय घ्या, असे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी झाली नाही. देखरेख समिती अस्तित्वात असताना प्रदूषणाची व्याप्ती वाढते आहे. त्याचा परिणाम रंकाळा तलाव व पंचगंगा नदीतील जैवविविधतेवर होत आहे.  

जलपर्णीचा विळखा वाढण्याची शक्‍यता आहे. पंचगंगचे पाणी काळसर व फेसाळयुक्त बनले आहे. मासे मृत झाले आहेत. प्रदूषणाचा विषय सदस्य सचिवांकडे न पाठविता आपण कोल्हापूरला भेट द्यावी, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे 
केली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT