Essential service stickers are being misused in lock down period 
कोल्हापूर

अत्यावश्यक सेवेच्या स्टिकरचा होतोय दुरुपयोग !

सकाळवृत्तसेवा

निपाणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉक डाऊन चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सकाळी सात ते दहा या वेळेतच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची वेळ असल्याने सगळे एकाच वेळी किराणामाल घेण्यासह मित्रांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहेत. या व्यतिरिक्त अत्यावश्यक स्टिकर असा गैरफायदा घेतला जात आहे. तसेच पोलिस बांधवांना मदत करण्याचा बहाणा करून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा चहापाणी व इतर सुविधा घेऊन दिवसभर वावर वाढला आहे. त्यामुळे कारवाई करणारे पोलीस बांधव याबाबत मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.

कोरोना ला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तरीदेखील नागरिक बेशिस्तपणा दाखवत घराबाहेर पडू लागले आहेत.त्यामध्ये अनेकांकडून किराणामाल घेण्यासाठी, औषध खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे कारण सांगितले जात आहे. डॉक्टर कडे निघालो आहे, औषध आणायला जात आहे, घरातील सर्व किराणा संपला आहे घेऊन येतो, स्वयंपाक गॅस सिलेंडर संपले आहे अशी खोटी कारणे देऊन बाहेर पडत आहेत. इतकेच नव्हे तर अत्यावश्यक सेवेसाठी तयार करण्यात आलेले स्टिकर वाहनावर लावून त्याचा दुरुपयोग केला जात आहे. यात काही भाग तर मागील वर्षाचे दवाखान्याचे औषधांची बिले घेऊन बाहेर पडत आहेत.

घरात करमेना म्हणून पेट्रोल भरायला जाणे मित्राकडे जाणे,कंटाळा आलाय म्हणून बाहेर पडलो, दूध आणायला जात आहे अशी एकापेक्षा एक कारणे देत नागरिक घराबाहेर पडत आहेत अशाच पद्धतीने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक बाहेर पडून स्वतःच्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. कामासाठी एखादाच व्यक्ती बाहेर पडल्यास पोलीस मारहाण करतात अशी समजूत करून अनेक जण पत्नीसह कुटुंबातील महिला सदस्यांना वाहनांमध्ये घेऊन जात आहेत. काहीजण पोलिसांनी घालून दिलेला नियम खोडसाळपणे कसा मोडता येईल. त्या दृष्टीनेही प्रयत्न करीत आहेत. एकंदरीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक विनाकारणच रस्त्यावर फिरत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

'केवळ अत्यावश्यक सेवेसाठी स्टीकर अथवा पास दिले गेले आहेत त्याचा गैरवापर करणाऱ्या वर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या वेळेस आपली कामे करून घेणे हिताचे ठरणार आहे.'
- कुमार हाडकर,
 उपनिरीक्षक, निपाणी शहर पोलीस ठाणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT