Everyone in Sangli Civil gets free vegetables kolhapur marathi news 
कोल्हापूर

काळजीच नाही ; यांच्यामुळे मिळतोय सांगलीतील डॉक्टर, नर्सिंग-स्टाफ ला भाजीपाला...

युवराज पाटील

दानोळी (कोल्हापूर) : रुग्णांची सेवा करणा-यांची सेवा दानोळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुकुमार पाटील-सकाप्पा हे करीत आहेत. 23 मार्चपासून  सांगली येथील सिव्हील हॉस्पीटलमधील सर्व डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी यांना मोफत भाजीपाल्याचे वाटप करीत आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळा भाजीपाला व्यवस्थीत पॅकींग करुन डॉक्टरांपासून सफाई कामगारांपर्यंत प्रत्येकाला देत असल्याने 24 तास सेवेत असलेल्या या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे काम सोपे झाले आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयात असणा-या नर्सिंग-स्टाफ मेस, डॉक्टर मेस व रुग्णाची मेस यासाठी कमी पडणारा भाजीपाला, दुधही ते पुरवित आहेत. 


 सध्या आरोग्य सेवा ही महत्वाची आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत. हॉस्पीटलमध्ये सेवा देवून घरातील दैनंदिन व्यवस्थापन करणं वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मुश्कील होत आहे. त्यात बाजारहाट भरणं म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे.
रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी यांची हि अडचण ओळखून श्री पाटील यांनी शेतक-यांकडून भाजीपाला विकत घेवून स्वत:च्या गाडीने सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये पोहचवित आहेत.

23 तारखेपासून सलग तीन दिवस व त्यानंतर एक दिवसआड भाजीपाला पोहचवीत आहेत. यामध्ये कोथींबीर, फ्लॉवर किंवा कोबी हे दररोज तर दोडका, वांगी, कारली, टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, लसून, कांदा हे वेगवेगळ्या दिवशी पूरविण्यात येत आहे. शेतक-यांच्या बाधांवर स्वत: जावून दर्जेदार भाजीपाला विकत घेवून टेम्पोने ते रुग्णालयात आणतात. तेथे गर्दी न होवू देता प्रत्येक डॉक्टर व कर्मचारी यांना भाजीपाला पोहचेल अशी व्यवस्था लावतात. त्यांना नियोजनात उदय राऊत यांचे सहकार्य लाभत आहे. 

हेही वाचा- संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या कोल्हापूरातील या साखर कारखान्याच्या एम डी वर गुन्हा दाखल....

रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी सामान्य जनतेसाठी अविरत सेवा बजावित आहेत. बाजारपेठ बंद असल्याने त्यांना भाजीपाला उपलब्ध करणे मुश्कील झाले आहे. जनतेसाठी सेवा देणा-यांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्या भावनेतून त्यांना दैनंदिन भाजीपाला पुरविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे कष्ट वाचत आहेत. 
सुकुमार पाटील-सकाप्पा
सामाजिक कार्यकर्ते, दानोळी

आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत

शासकिय रुग्णालयात एका वेळेस जवळपास साडेसातशे कर्मचारी काम करतात. त्यांना लॉकडाऊनमुळे भाजीपाला मिळविणे अवघड बनले होते. त्यांची सोय सुकुमार पाटील यांनी केली आहे. त्यासोबत येथे 280 रुग्ण व तेवढेच नातेवाईक आहेत. त्यांना मेसमधून जेवणाची सोय होते. तेथेही काही कमी पडेल ते पाटील देत आहेत. त्यामुळे सिव्हीलमधील भाजीपाल्याचा विषयच त्यांनी संपवून टाकला आहे. आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत.
डॉ. सुबोध उगाणे, ओएसडी सिव्हील रुग्णालय, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT