कोल्हापूर

सांगली - जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

सुरूवातीला सैन्यातून निवृत्त होताच त्यांना जत पंचायत समिती सदस्य पदाची संधी मिळाली

सकाळ डिजिटल टीम

जत : जतचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमाजीराव धानाप्पा सनमडीकर काका यांचे आज मंगळवारी पहाटे 6:30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने सांगली येथे उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. दिवंगत नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात काँग्रेस तळागाळात पोहोचवली.

सुरूवातीला सैन्यातून निवृत्त होताच त्यांना जत पंचायत समिती सदस्य पदाची संधी मिळाली. यानंतर श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांनी प्रथम १९८४ साली पहिली विधानसभा निवडणूकीत संधी दिली. ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले. पुन्हा १९८९ साली जतची जागा रिपाइंला सोडण्यात आली. त्यावेळी उमाजीराव सनमडीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. अपक्ष म्हणून ते निवडून आले.

१९९४ साली विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. यानंतर ही त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग ठेवला. पुन्हा काँग्रेसच्या चिन्हावर १९९९ ला ते विजयी झाले. यानंतर २००२ मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली. यानंतर त्यांचा राजकीय सहभाग कमी होत गेला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सांगली येथे उपचारा दरम्यान त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दुपारी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी जत येथील सनमडीकर हॉस्पिटलमध्ये ४ ते ६ या वेळेत ठेवण्यात येणार आहे तसेच अंत्यविधी सनमडी (ता. जत) येथे सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांचे सुपुत्र डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT