ex vioce chairman Dr. vijay khole discuss with students in comvacation ceremoney in kolhapur 
कोल्हापूर

'कोरोनाकाळात देशाने जे काम केलं ते आश्चर्यकारक'

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : नवे संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्‍स यामुळे आरोग्य क्षेत्राचा चेहरा मोहरात बदलला. पूर्वी अशक्‍य वाटणाऱ्या शस्त्रक्रिया आता होऊ लागल्या आहेत. असे असले तरी चांगले उपचार सर्वसामान्याच्या आवाक्‍यात राहीले पाहीजेत. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखीत झाले. ही व्यवस्था अधीक सक्षम करण्याचे आव्हान तुम्ही स्विकारा. असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विजय खोले यांनी केले. डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीअंतर्गत येणाऱ्या अभिमत विद्यापीठाच्या 9 व्या दीक्षांत समारंभात प्रमूख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

वैद्यकशास्त्राशी संबंधीत विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध अभिनेता आर.माधवन, गीतकार, शाहीर कुंतिनाथ करके-पाटील यांना डिलीट पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. एअर मार्शल अजित भोसले यांना डी.एस पदवीने गौरवण्यात आले.

यावेळी डॉ.खोले म्हणाले, 'वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. नवे संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्‍स यामुळे आरोग्य क्षेत्राचा चेहरा मोहरात बदलला. पूर्वी अशक्‍य वाटणाऱ्या शस्त्रक्रिया आता होऊ लागल्या आहेत. कोरोनाकाळात आपल्या देशाने जे काम केले ते आश्‍चार्यकारक आहे. अमेरिकेच्या तुलनेत आपली रुग्णसंख्या फारशी कमी नव्हती. तरी मृत्यूचे प्रमाण कमी होते. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक होते. याबद्दल सर्वत्र आश्‍चार्य व्यक्त करण्यात आले. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखीत झाले. आरोग्य व्यवस्था सर्व सामान्यांच्या आवाक्‍यात असणे आवश्‍यक आहे. तसेच आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचे आव्हानही तुमच्या समोर आहे. ते तुम्ही स्विकारले पाहीजे. तंत्रज्ञानाच्या वापर जरी आवश्‍यक असला तरी वैद्यकीय क्षेत्रातीन मानवता आणि सेवाभाव टिकला पाहीजे.' 

या पदवीप्रदान सोहळ्याला कुलपती डॉ.संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ.राकेश मुदगल, प्रकुलगुरू डॉ. शिल्पा शर्मा, पृथ्वीराज पाटील, पूजा पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डॉ.खाले यांचा कानमंत्र 

  • सतत शिकत राहा. 
  •  स्वतःला ज्ञानाच्या पातळीवर अद्ययावत ठेवा. 
  •  वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव शब्दबद्ध करा. 
  •  मानवी मुल्यांची जपणूक करा. 
  •  व्यावसायिक कौशल्याबरोबरच सेवाभाव बाळगा. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT