exam of 10th and 11th board seating arrangement in related school in kolhapur 
कोल्हापूर

दहावी बारावीच्या परीक्षा; संबंधित शाळांमध्येच असणार बैठक व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित शाळेतच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होणार असल्याने परीक्षा यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांची दरवर्षी नोंदणी होते. राज्य माध्यमिक, तसेच  उच्च माध्यमिक मंडळाला परीक्षा केंद्रांची फेररचना करावी लागणार असून, उपकेंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे.

लगतच्या चार ते पाच शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एकाच केद्रात पूर्वी केली जायची. संबंधित विद्यार्थी हा त्याच शाळेचा विद्यार्थी असल्याने त्याला गैरमार्गाचा अवलंब करण्याची संधी मिळू नये यासाठी आसपासच्या शाळेत नंबर टाकले जात होते. आता ज्या शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी तेथेच बैठक व्यवस्था होणार असल्याने विद्यार्थी, तसेच पालकांना दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या शाळेत आदल्या दिवशी जाऊन बैठक व्यवस्थेची खात्री करा, ऐनवेळी खोली क्रमांक न सापडल्यास होणारी धावपळ आता कमी होईल.

शाळेच्या इमारतीची आणि शिक्षकांचा परिचय असल्याने दुसऱ्या शाळेतील पर्यवेक्षक कसे असतील, ही भीती विद्यार्थ्यांना राहणार नाही. कोरोनामुळे शालेय शिक्षण विभागाने पहिल्यांदाच ज्या शाळेचे विद्यार्थी, त्याच ठिकाणी बैठक व्यवस्थेचा निर्णय घेतला आहे. पूर्वी अकरा वाजता सुरू होणारा पेपर आता साडेदहाला सुरू होईल. त्यामुळे सकाळी दहा वाजताच शाळेत विद्यार्थ्यांना दाखल व्हावे लागेल. अर्ध्या तासाची वेळ वाढवून दिल्याने शेवटच्या काही मिनिटात प्रश्‍न सोडविण्यासाठीची घाई कमी होईल. 

दहावी-बारावीचे विद्यार्थी सध्या अभ्यासात व्यस्त आहेत. अभ्यासक्रमात थोडीफार कपात झाली, तर परीक्षेच्या पॅटर्नमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कोरोनामुळे थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग हा भागही महत्त्वाचा होता. दुसऱ्या शाळेत ही व्यवस्था करताना संबंधित शाळा व्यवस्थापनाला कसरत करावी लागत होती. आता संबंधित शाळेतच बैठक व्यवस्था असल्याने कोरोनाच्या उपाययोजना करण्यासही अडचण निर्माण होणार नाही. कोल्हापूर, सांगली, तसेच सातारा जिल्ह्यांत ५२२ परीक्षा केंद्रे कोल्हापूर विभागीय मंडळाने निश्‍चित केली होती. त्यात बदल करावा लागेल. संबंधित शाळेत बैठक व्यवस्था असली तरी विभागीय मंडळाचे कर्मचारी केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करेल.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT