exam cancelled but evaluation of students study in kolhapur 
कोल्हापूर

विद्यार्थ्यांना आकलन समजणार तरी कसे ? परीक्षा नाही, मूल्यमापन तरी करा, पालकांची अपेक्षा

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शालेय परीक्षा झाल्या नाहीत. यंदाही परीक्षा होणार नाहीत. परीक्षा म्हणजेच शिक्षण असे नसले, तरी विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा उपयुक्त असते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे परीक्षा घेणे शक्‍य नसले तरी ऑनलाईन किंवा अन्य पर्यायातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे, अशी पालकांची भूमिका आहे. 

कोरोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्या. ऑनलाईन शिक्षण सुरू होते; पण सर्वांना आवश्‍यक ती साधने उपलब्ध होतीच असे नाही. बरेच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेले आहेत. अशा काळात यंदाही परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थ्यांत जरी आनंदाचे वातारण असले, तरी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व्हावे. त्यांचे आकलन किती झाले आहे, हे त्यांना समजावे. गुणवत्ता सिद्ध करता यावी या दृष्टीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे, अशी पालक आणि शिक्षणतज्ज्ञांची भूमिका आहे. 

"ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची नामी संधी होती. पालकांनी त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे गरजेचे होते. ज्यांनी हे केले त्यांना भविष्यात फायदा नक्कीच होईल. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परीक्षा घेणे जरी शक्‍य नसले तरी ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता येणे शक्‍य आहे."

- जुई कुलकर्णी, निवृत्त शिक्षिका 

"पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही; पण परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यमापन करण्याची संधी मिळते. या दृष्टिकोनातून परीक्षा घेणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना एकत्र बसवणे शक्‍य नसल्याने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे आवश्‍यक आहे."

- संपत गायकवाड, माजी शिक्षण सहायक संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT