Examination activities to relieve stress in the exam  
कोल्हापूर

...यामुळे होईल विद्यार्थ्यांचा परीक्षेतील तणाव दूर  

सुनील. स. पाटील

वडणगे  : राज्यातील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुढाकार घेतला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या दिवसांमध्ये मानसिक संतुलन चांगले रहावे, परीक्षा तणावमुक्त वातावरणात देता यावी यासाठी आयोगाच्या वतीने परीक्षापर्व राबवण्यात येणार आहे. काही दिवसांतच दहावी व बारावीच्या परीक्षांना सुरूवात होणार असून, या परीक्षांपूर्वी विशेष शिबिर व फेसबुक, ट्‌विटर व यूटयूबच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. 

परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. मात्र, अनेकदा परीक्षेची भीती, ताणामुळे विद्यार्थी दबावात जातात. काही विद्यार्थी तर नैराश्‍येतून टोकाचे पाऊल उचलतात. विद्यार्थ्यांच्या रीक्षेचा ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क अधिकार संरक्षण आयोग विविध उपाययोजना करत असते. त्यानुसार आयोगाने नववी ते बारावीपर्यतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात असणारा ताण कमी व्हावा, मानसिक संतुलन चांगले रहावे या उद्देशाने परीक्षापर्व हा उपक्रम रावबण्यात येत आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोग ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक व प्राचार्य यांना याबाबतचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची अनाठायी भीती असते. ही भीती ,तणाव दूर करण्यासाठी परीक्षापर्व हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. 
- डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, 
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT