Exciting history of Panhala-Pavankhind route unfolded 
कोल्हापूर

पन्हाळा-पावनखिंड मार्गाचा उलगडला रोमांचक इतिहास 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : पन्हाळा ते पावनखिंड मार्गावर घडलेल्या रोमांचक इतिहासाचे पदर आज येथे उलगडले गेले. बांदल मावळ्यांचे शौर्य, वीररत्न शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान अन्‌ शिवछत्रतींनी विशाळगडच्या पायथ्याशी गाजवलेल्या पराक्रमाच्या स्मृती जाग्या झाल्या. निमित्त होते, पन्हाळा-पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे आयोजित "फेसबुक लाईव्ह' संवादाचे. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके व शिवशाहीर राजू राऊत यांनी दुर्गभ्रमंतीतील अनुभव सांगत इतिहासाची माहिती दिली. विनोद साळोखे व सागर पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

यंदा कोरोनाच्या संकटामुळे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम स्थगित केली. पदभ्रमंतीच्या स्मृतींना उजाळा देत रणसंग्रामाची माहिती इतिहासप्रेमींना व्हावी, यासाठी फेसबूक मुलाखतीचे आयोजन केले होते. या अंतर्गत दुर्ग भ्रमंतीत आयुष्य वेचणारे डॉ. अडके व शाहिरीच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास जनमानसात पोचवणारे राऊत यांच्याशी संवाद साधण्यात आला. 

डॉ. अडके यांनी सिद्धी जौहरच्या वेढयातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले नियोजन, हेरखात्याची भूमिका, शिवा काशीद यांचे बलिदान, सह्याद्रीच्या रांगांचा केलेला कल्पक वापर, युद्धासाठी बांदल सैन्याची केलेली निवड, चौकेवाडीत शत्रुसैन्याशी पडलेली बांदल मावळ्यांची गाठ, लढाईत वापरलेली शस्त्रे यांची माहिती दिली. तसेच फरसबंदीच्या मार्गाच्या संशोधनावरही प्रकाश टाकला. तसेच विशाळगडाच्या पायथ्याला शिवछत्रपतींनी गाजवलेल्या पराक्रम स्पष्ट केला. 

राजू राऊत यांनी शाहिरीतून शिवछत्रपतींचा इतिहास जागवला. त्यांनी पावनखिंडीतील रणसंग्राम जगातील गाजलेल्या युद्धांपैकी एक असून, या युद्धाला तोड नाही, असे सांगितले. या वेळी हेमंत साळोखे, साताप्पा कडव, सागर पाटील, शाहीर दिलीप सावंत, अजिंक्‍य जाधव, सागर पाडळकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- पन्हाळा-पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे फेसबुक लाईव्ह 
- कोरोनामुळे पदभ्रमंती मोहिम स्थगित 
- फरसबंदीच्या मार्गाच्या संशोधनावरही प्रकाश 
- शाहिरीतून जागवला शिवछत्रपतींचा इतिहास

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

Shubman Gill : शुभमन गिलला संघातून वगळले, पुनरागमन लांबणीवर पडले; निवड समितिच्या निर्णयाने सर्वच अचंबित

Panchang 3 January 2026: आजच्या दिवशी दशरथ विरचित शनिस्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pume Municipal Election : भाजपच्या अनेकांचे बंड झाले थंड

अक्षय खन्नाने भर मंडपात गर्लफ्रेंडला केलेला किस, प्रेमात होता पुर्णपणे वेडा, कोण होती ती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT