Kolhapur Exit Poll Results esakal
कोल्हापूर

Kolhapur Exit Poll Results : कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेत सरूडकर? विविध 'एक्झिट पोल'चा अंदाज

लोकसभेसाठी काल मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज सायंकाळी जाहीर केले.

सकाळ डिजिटल टीम

चौरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात ‘वंचित’ची मते सर्वच सर्वेक्षणात बेदखल करण्यात आली आहेत.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील (Kolhapur Lok Sabha Elections) शेवटच्या टप्प्याचे मतदान काल संपल्यानंतर विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक अंदाजातून कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj), तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर (Satyajit Patil-Sarudkar) विजयी होणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी वर्तविला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी (ता. ४) असून, त्याच दिवशी या निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

देशभरात निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. लोकसभेसाठी काल मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज सायंकाळी जाहीर करण्यात आले. त्यात सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या आहेत.

सी-व्होटर, इलेक्ट्रॉल संस्था, लोकशाही, टीव्ही नाईन, साम आदी वृत्तवाहिन्यांसह अन्य विविध संस्थांनी राज्यातील त्या त्या जिल्ह्यांचा अंदाज जाहीर केला. कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विरुध्द महायुतीचे खासदार संजय मंडलिक अशी लढत होती. ही जागा काँग्रेस २५ वर्षांनंतर चिन्हावर लढत आहे. त्यात श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी असलेला सन्मान, राजर्षी शाहू महाराजांचे वारस, पुरोगामी विचारांचे पाईक या मुद्यांवर सर्वच संस्थांनी शाहू महाराज हेच कोल्हापुरातून विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

चौरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात ‘वंचित’ची मते सर्वच सर्वेक्षणात बेदखल करण्यात आली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ‘वंचित’च्या उमेदवारास एक लाख २३ हजार मते पडली होती. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी, खासदार धैर्यशील माने यांच्याविषयीची नाराजी आणि श्री. शेट्टी यांची धरसोड भूमिका असे मुद्दे मांडत सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी सरूडकर या मतदारसंघातून विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे. पण या मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण राहील, याचीही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आमदाराऐवजी मुलानेच दाबलं EVM चं बटण? दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार, जिल्हाधिकारी म्हणाले...

औरंगजेबाच्या 'या' लेकीच्या स्मरणात छत्रपती शाहूंनी बांधली खास वास्तू ; आग्रा भेटीत मोठ्या बहिणीचं योगदान

T20 WC, IND vs USA: ६ ओव्हर, ४ विकेट्स! भारताला पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने दिले मोठे धक्के; अभिषेक शर्मा, शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आऊट

'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' येणार नाही... केदार शिंदेंचा धक्कादायक खुलासा; चाहत्यांचा हिरमोड करणारं मोठं कारण समोर

ZP Elections 2026 Voting Live Update : विवाह समारंभातून सोनं लंपास

SCROLL FOR NEXT