Extra money will have to be paid for fancy numbers 
कोल्हापूर

फॅन्सी नंबरसाठी मोजावे लागणार जादा पैसे

लुमाकांत नलवडे


कोल्हापूर ः वाहनांवरील फॅन्सी क्रमांकाचे (नंबरचे) गणित आता बदलणार आहे. क्रमांक एकसाठी आता चार लाख रुपयांऐवजी सहा लाख रुपये घेण्याचा विचार शासन करीत आहे. अशाच पद्धतीने गलेलठ्ठ महसूल प्रत्येक फॅन्सी क्रमांकांतून मिळविण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. त्यासाठी नवे क्रमांक आणि त्याचे अधिकृत शुल्क याबाबतची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तीन डिसेंबरपासून तीस दिवसांत याबाबत हरकती संबंधित संकेतस्थळावर देता येणार आहेत. 
काही गावे, काही नेते, काही उद्योजक केवळ त्यांच्या वाहनांच्या क्रमांकावरून ओळखले जातात. फॅन्सी क्रमांकासाठी चक्क लिलाव होतात. यामुळे फॅन्सी क्रमांकाची धूम ओळखून महसूल वाढविण्याचा प्रयत्न शासनाने पुन्हा एकदा केला आहे. यापूर्वी 2007 नंतर 15 मे 2013 ला फॅन्सी क्रमांकाची यादी आणि नवे दर जाहीर झाले होते. तेव्हा दुचाकी, तीनचाकी आणि परिवहन विभागासाठी क्रमांक एकसाठी पन्नास हजार रुपये मोजावे लागत होते. हाच क्रमांक मोटारीला किंवा अन्य वाहनांना पाहिजे असल्यास त्यासाठी चार लाख रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता दुचाकीसाठी पन्नास हजारांहून एक लाख रुपयांवर तर चारचाकीसह तत्सम वाहनांसाठी चार लाखांहून सहा लाख रुपये शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. अशाच पद्धतीने काही मिरर क्रमांकांचा समावेश सुद्धा फॅन्सी नंबरमध्ये केला असून काही क्रमांक कमी केले आहेत, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 
----------- 
जम्पिंग क्रमांकासाठी तिप्पट शुल्क 
दुचाकीचा जम्पिंग क्रमांक तिप्पट शुल्क भरून मोटारीला घेण्याची पद्धत आहे. हे शुल्क ही वाढविले आहे. दुचाकीचा क्रमांक चारचाकीसाठी दिला जातो. असा क्रमाक घेणाऱ्यांची ही संख्या अधिक आहे. साधारण शुल्कात तिप्पट वाढ केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागातून मिळाली आहे. 

दृष्टिक्षेपात प्रस्ताव 
0 मीरर क्रमांकांचाही समावेश आता फॅन्सी क्रमांकामध्ये 
0 यापूर्वी 341 क्रमांकासाठी, आता 231 फॅन्सी क्रमांक 
0 जम्पिंग 1000 पेक्षा अधिक क्रमांकासाठीही शुल्कवाढ 
0 मोटारीला 15 , दुचाकी, तीनचाकी 6 हजार प्रस्तावित शुल्कवाढ 
0 प्रादेशिक परिवहन विभागाला फॅन्सी क्रमांकातून वर्षाला 5 कोटींचे उत्पन्न 

प्रक्रियेत अशी दुरुस्ती शक्‍य. 
एक नंबरसाठी पाच-सहा लाख रुपये शुल्क भरणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे त्यासह असे अनेक क्रमांक शुल्क भरून घेतले जात नाहीत. परिणामी त्या सीरिअलमधील क्रमांक कोणालाही मिळत नाहीत. उत्पन्न वाढविण्याच्या प्रक्रियेत चुकीच्या निर्णयामुळे उत्पन्नात वाढ होत नाही. यात सुधारणा करून पाचशे-हजार रुपये असे कमीत कमी शुल्क आकारून अधिकाधिक क्रमांकाला शुल्क आकारल्यास त्यातून अधिक महसूल मिळू शकेल. तसेच अपेक्षित फॅन्सी क्रमांकासाठी लिलाव होतो. त्यामुळे त्यातून उत्पन्न वाढीलाही वाव आहे. 
------------- 
 
शासनाच्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार फॅन्सी क्रमांक आणि त्याच्या शुल्कामध्ये बदल होणार आहेत. ज्यांना हरकती घ्यावयाच्या आहेत. त्यांनी http://www.dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदवाव्यात. 3 डिसेंबरपासून तीस दिवसांनंतर प्रस्तावित क्रमांक लागू होणार आहेत. तत्पूर्वी हरकती नोंदविणे अपेक्षित आहे. 
- डॉ. स्टिव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर विभाग.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT