Eye Donate Movement grow In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Eye Donate Movement grow In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

नेत्रदानाने गाठली "साठी' 

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : गडहिंग्लज व आजरा तालुक्‍यात सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीने "साठी' गाठली. येथील शैला शंकरराव हत्तरकी यांचे आज मरणोत्तर नेत्रदान झाले. चळवळीतील हे 60 वे नेत्रदान ठरले. ग्रामीण भागात सुरू झालेली ही चळवळ आता शहरातही रुजत आहे. गडहिंग्लज शहरातील गेल्या दोन महिन्यातील दुसरे, तर एकूण चौथे नेत्रदान ठरले. 

गडहिंग्लज तालुक्‍यातील अत्याळ, बेळगुंदी, करंबळी, कौलगे, ऐनापूर, भडगाव या गावासह आजरा तालुक्‍यातील सरोळी गावात नेत्रदान चळवळीचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. प्रबोधनाच्या पातळीवर चांगले काम झाल्यामुळे चळवळ रुजली आहे. या गावातून 49 जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. याशिवाय गडहिंग्लज शहरासह नूल, लिंगनूर कसबा नूल, शिप्पूर तर्फ आजरा, उत्तूर (ता. आजरा), बामणे (ता. भुदरगड) या गावातील 10 जणांचे नेत्रदान झाले. 

ग्रामीण भागातून सुरवात झालेली ही चळवळ गडहिंग्लज शहरातही रूजत आहे. यापूर्वी तीन जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले होते. दरम्यान, येथील डॉक्‍टर्स कॉलनीतील शैला हत्तरकी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. तालुक्‍यात सुरु असलेल्या चळवळीची माहिती असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंकूर आय हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांच्या पथकाने हत्तरकी यांच्या घरी जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. शैला हत्तरकी यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील झील एंटरप्रायझेसचे सुनील हत्तरकी यांच्या त्या आई होत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT