facebook social media crime in kolhapur marathi news
facebook social media crime in kolhapur marathi news  
कोल्हापूर

फेसबुकवरुन त्यांची झाली मैत्री ; अन् तिच्याशी केले त्याने घाणेरडे कृत्य..

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मोर्फिंग करून अश्‍लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका महिलेने दोन तरुणांवर राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. समाधान कांबळे (वय २८) आणि गणेश हेळकर (दोघेही भारतनगर) अशी संशयितांची नावे आहेत.  

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी

 एका महिलेच्या छायाचित्राचे मॉर्फिंग करून अश्‍लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केले होते. चुकीच्या पद्धतीने छायाचित्रे टाकून  बदनामी केली आहे, अशी तक्रार राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.  

फेसबुकवर दोघांशी केली मैत्री 

यातील संबंधित महिलेचे फेसबुक या सोशल मीडियावर अकाउंट आहे. फेसबुकवर महिलेची दोघांशी मैत्री झाली होती. छायाचित्रात बदल करून दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावून अश्‍लील छायाचित्र तयार केले. नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत तिने आपल्या पतीबरोबर येऊन राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर पोिलस ठाण्याच्या मदतीने पोिलस तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Latest Marathi News Live Update : कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

SCROLL FOR NEXT