कोल्हापूर

कागल तालुक्‍यात येणाऱ्यांची येथे केली सोय

प्रतिनिधी

कागल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून, राज्यातून कागल तालुक्‍यात येणाऱ्या गावकऱ्यांना त्यांच्या गावातील मराठी शाळेत ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी तालुक्‍यातील 121 शाळांतील 760 खोल्या प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या खोल्यांमधून तीन हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, ""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्या-मुंबईसह इतर राज्यांतून गावाकडे येण्याची तयारी अनेकांनी केली आहे. अशा 787 लोकांनी तालुक्‍यात येण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. अशा लोकांची संस्थात्मक क्वारंटाईनसाठी त्यांच्या गावातील शाळांमध्ये व्यवस्था केली आहे. यासाठी तालुक्‍यातील 121 शाळांमधील 787 खोल्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. याबाबतच्या काही जबाबदारीसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.'' 
त्या म्हणाल्या, ""कागलच्या कोरोना केअर सेंटरमध्ये सात दिवसांत 1265 लोकांची तपासणी करण्यात आली. यातील 1044 लोकांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले असून, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गावी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. यातील 50 लोकांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच निगेटिव्ह आहेत. कागल शहर बाहेरून आलेल्या पंधरा जणांना शाहू हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह तालुक्‍यातील पॉझिटिव्ह रुग्णांकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. तालुक्‍यातील गावांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे. गावपातळीवर कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'' 
यावेळी नायब तहसीलदार शिवाजी गवळी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Wedding Card : टीपू सुलतान प्रेरणास्थान, शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका व्हायरल...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३० तास पाणीपुरवठा ठप्प, 'या' सहा विभागातील जलवाहिनी बंद होणार; कधी? वाचा सविस्तर

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते- प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT