आरोपी अबरार जमादार sakal
कोल्हापूर

बेळगांव: बनावट आरटीपीसीआर प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी: येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश देण्यार्या खाजगी बसेस वर कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी तिघांना ताब्यात घेतले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोगनोळी येथील फाट्यावर महाराष्ट्र व इतर राज्यातून खाजगी बस व शासकीय बस मधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तपासणी केली जाते. गुरुवार तारीख तीन रोजी कोल्हापूर येथील खाजगी बस चालक प्रवाशांचे बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून प्रवाशांना कर्नाटकात सोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील खाजगी बस ऑफिस मध्ये साध्या वेशात पोलिसांना पाठवून आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसून आपल्याला कर्नाटकात जायचे आहे असे सांगितले. यावेळी ऑफिसमध्ये असलेल्या लोकांनी तिकीट व रिपोर्ट आम्ही देऊ असे सांगून त्यांना कर्नाटकात जाणाऱ्या बसमध्ये बसवले. सदर बस कोगनोळी फाट्यावर असणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावर आले असता. वरिष्ठ अधिकारी व पोलिसांनी कसून चौकशी केली. बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी तात्काळ तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची चौकशी केली असता. अबरार मुस्ताक जमादार वय 32 राहणार विक्रम नगर कोल्हापूर असे नाव समोर आले. निपाणी पोलिसांच्या वतीने कोल्हापुरात जाऊन सापळा रचून आबरारला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी करून कोर्टासमोर हजर करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.

सदर कारवाई चिकोडीचे डीवायएसपी बसवराज यलिगार, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, पी एम घस्ती, अमर चंदनशिव, शेखर आसोदे, राजू नदाफ यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT