famous Dudhsagar Falls in the dense forest on the Karnataka Goa border 
कोल्हापूर

प्रसिद्ध 'दूधसागर' धबधबा तुम्ही पाहिलाय काय ? पण यंदा तुम्हाला तिथे जाता येणार का...?

सकाळवृत्तसेवा

रामनगर (बेळगाव) - गेल्या काही दिवसात पश्‍चिम घाटात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहीत होऊ लागले आहेत. कर्नाटक-गोव्याच्या सीमेवर घनदाट जंगलात असलेला प्रसिद्ध दूधसागर धबधबाही आता कोसळू लागला आहे. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे पर्यटकांना या धबधब्याच्या सौंदर्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाला सुरवात होताच देशविदेशातील पर्यटकांना दूधसागर धबधब्याची आठवण होते. दरवर्षी हा धबधबा जुलैनंतरच पूर्ण क्षमतेने प्रवाहीत होतो. पण, यंदा पहिल्याच पावसात दूधसागर कोसळू लागला आहे. त्याचे रौद्ररुप आताच दिसून येत आहे. उंच शिखरावरुन कोसळणारा हा धबधबा अद्याप पूर्ण क्षमतेने कोसळत नसला तरी त्याचे रुप पाहण्यासारखे आहे. धबधब्याचे शुभ्र पाणी आताच पर्यटकांना साद घालत आहे. पण, यंदा कोरोनामुळे धबधबा पाहण्याची इच्छा मनातच ठेवावी लागणार आहे.

दूधसागर धबधाबा पाहण्यासाठी पूर्वी देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत होते. मात्र, मध्यंतरी धबधब्यात बुडून झालेले मृत्यू, पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी, रेल्वेत चढताना पडून जखमी होणे, रेल्वे अधिक काळ थांबत नसल्याने वातानुकुलीत डब्याच्या काचा फोडणे असे प्रकार झाले होते. त्यामुळे प्रशासनाने धबधब्याच्या ठिकाणी येण्यास पर्यटकांना बंदी घातली होती. मात्र ही बंदी गतवर्षी हटविल्यानंतर बेळगाव-वास्को लोकल रेल्वे सुरु करण्यात आली होती. त्यामुळे, पर्यटकांची वर्दळ वाढली होती. पण, यंदा कोरोना संकटामुळे पर्यटनस्थळी जाण्यास निर्बंध असल्याने धबधब्याचे सौंदर्याला मुकावे लागणार असल्याने पर्यटकांत नाराजी आहे.

कॅसलरॉकमध्ये बेरोजगारी

एकेकाळी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे कॅसलरॉक गावात जत्रेचे स्वरूप येत होते. पण, मध्यंतरी बंदीमुळे गावातील लोकांचा रोजगार बुडाला होता. गतवर्षी बंदी उठवल्यानंतर गावातील युवकांना पुन्हा रोजगार मिळाला होता. पण, यंदा लॉकडाउनमुळे रेल्वे बंद असल्याने कॅसलरॉकमधील युवक बेरोजगार झाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT