Famous poet Sandeep Khare FasTag social media post marathi news 
कोल्हापूर

FasTag Update : फास्टॅगचा स्लोस्टॅग;  "आयुष्यावर नव्हे' फास्टॅगवर बोलू काही! संदीप खरे यांना फास्टॅग फटका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : किणी टोल नाक्‍यावर फास्टॅगमुळे होणारी बाचाबाची आणि गर्दी आता काही नवी राहिली नाही. मात्र प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनाही या फास्टॅगच्या समस्येमुळे ताटकळत थांबावे लागलेच; पण दंडाची मागणी करणाऱ्या टोलवरील कर्मचाऱ्याच्या वागण्याचा मनःस्तापही झाला. त्यामुळे फास्टॅगचा स्लोटॅग होतोय अशी भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. 

प्रत्येक चारचाकी किंवा त्यापेक्षा मोठे असणाऱ्या वाहनाला फास्टॅग बंधनकारक आहे. मात्र अद्याप बहुतांशी वाहनांनी फास्टॅग खाते उघडलेले नाही. ज्यांनी गाडीला फास्टॅग लावले त्यांनाही टोल नाक्‍यावर मनःस्ताप सहन करावा लागत आहे. नुकताच याचा अनुभव प्रसिद्ध कवी संदीप खरे यांना आला. आपल्या भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. 

या प्रसंगाबाबत खरे म्हणाले, ""किणी टोल नाक्‍यावर माझी मोटार आली. कर्मचाऱ्याने चालकाच्या बाजूने वाकून काचेच्या मध्यभागी असणारे फास्टॅग स्टीकर स्कॅन केले. ते स्कॅन झाले नाही. यावेळी मोटार पुढे मागे करूनही पाहिली; पण स्कॅन झाले नाही. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने माझ्याकडे टोलसह दंडाच्या रकमेची मागणी केली. माझ्या फास्टॅग खात्यात पैसे आहेत मी पैसे देणार नाही, असे सांगितले.

त्यानंतर तेथे त्यांचा उत्तर भारतीय असणारा वरिष्ठ अधिकारी आला. त्यानेही दंडाची मागणी केली; मात्र मी पैसे देणार नाही असे सांगितले. त्यानंतर पुन्हा स्कॅन करून पाहिले असता स्कॅन झाले; मात्र या सगळ्या गोंधळात वेळ गेला. फास्टॅग स्कॅन करणारी यंत्रणा सुधारली पाहिजे. आवश्‍यक गोष्टी करा पण फास्टॅग यंत्रणा सक्षम करा. अन्यथा फास्टॅगचा स्लोस्टॅग होईल.' अर्थपूर्ण गीते लिहिणाऱ्या आणि एरवी आयुष्यावर बोलू काही म्हणाणाऱ्या खरे यांना फास्टॅगवर बोलू काही असे म्हणावे लागले. 

संपादन-अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT