fare hike announced after four years kolhapur marathi news 
कोल्हापूर

रिक्षात बसताच क्षणी २२ रुपयांचे मीटर;  १ मेपासून होणार भाडेवाढ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तब्बल चार वर्षांनी रिक्षाचालकांना आज भाडेवाढ जाहीर झाली. रिक्षाचे सुरवातीचे किमान भाडे २० वरून २२ रुपये करण्यात आले. तसेच तेथून पुढे प्रत्येक किलोमीटरचे भाडे १७ वरून १८ रुपये करण्यास मंजुरी दिली आहे. १ मेपासून ही भाडेवाढ लागू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली. 


जिल्ह्यातील सुमारे बारा हजार रिक्षाचालकांना याचा फायदा होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सर्व बाबींचा विचार करून हकीम समितीच्या शिफारशीनुसार वाहनाची किंमत, घसारा, कर, विमा, दुरुस्ती देखभाल खर्च, महागाई निर्देशांक, इंधन खर्च या सर्व बाबींचा समावेश करून भाडेवाढ दिली आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी प्राधिकरणाची बैठक झाली होती.

 प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई, सचिव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सदस्य प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. त्यानंतर दरवाढ देण्याबाबतची मागणी केली होती. त्यामुळे ही दरवाढ केली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये रिक्षाभाडे वाढ केली होती. त्यानंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढले. मेंटेनन्स्‌, इन्शुरन्स वाढला. यामुळे भाडेवाढ देणे आवश्‍यक असल्याचे प्राधिकरणाला दिसले. तसेच यापूर्वी इतर जिल्ह्यात रिक्षाभाडे वाढ दिली आहे. या सर्वांचा विचार करून भाडेवाढ दिल्याचे डॉ.अल्वारिस यांनी  सांगितले.

दृष्टिक्षेपात...
 सुरवातीचे किमान भाडे २० वरून २२ रुपये
 तेथून पुढे प्रत्येक किलोमीटरचे भाडे १७ वरून १८ रुपये
 मीटर कॅलिब्रेशनसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत 
 कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षाधारकांसाठी नवीन दर १ मेपासून लागू 
 रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत दीडपट भाडे
 प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत प्रशासनाचं स्पष्टीकरण; बावनकुळेंकडे सोपवला अहवाल

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींचे रांचीमध्ये आंदोलन; विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो विधानसभेच्या घेराव मोर्चात सहभागी

Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? तुकाराम मुंढेंनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव; किस्सा ऐकून सगळेच हसले

MS Dhoni Pension : सहा वर्षांपूर्वी निवृत्ती, IPL मध्ये अजूनही खेळतोय महेंद्रसिंग धोनी! भारताच्या माजी कर्णधाराला पेन्शन किती?

SCROLL FOR NEXT