The farmer did not receive the insurance amount in kolhapur kagal 
कोल्हापूर

चूक अधिकाऱ्यांची, फटका शेतकऱ्याला 

सकाळ वृत्तसेवा

म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथील शेतकरी शहाजी गणपती पाटील यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. त्यांनी विमा रक्कमही भरली होती. पण कृषी कार्यालय व विमा कंपनी, बॅंक प्रतिनिधीच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांना या विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. शेतकरी पाटील हे याबाबात कागल तहसीलदार, कृषी कार्यालय व बॅंकेकडे हेलपाटे मारुन थकले पण त्यांना न्याय मिळाला नाही. 

अल्पभूधारक असलेल्या शहाजी गणपती पाटील यांनी सन 2019-20 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रस्ताव दिला होता. पीक विम्याची मुदत 31 जुलै असताना त्यांनी 18 जुलै रोजी पीक विम्याचे चलन बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा म्हाकवेमध्ये भरले होते. ऑगस्टमध्ये आलेल्या पुरात त्यांचे संपूर्ण पीक बुडाले. पुरात बुडालेल्या या पिकाचा कृषी सहाय्यक रियाज पखाले यांनी पंचनामा केला. परंतु अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे भरूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. 

कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांच्याकडून हलगर्जीपणा होत आहे. बॅंकेनेही पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अधिकाऱ्याच्या चूकीमुळे पिकविम्याची नोंदणीच झालेली नाही. त्याचा फटका या शेतकऱ्याला बसला आहे. 
बानगे (ता.कागल) येथील अल्पभूधारक शेतकरी शहाजी गणपती पाटील यांची दोन्ही मुले अंध तर पत्नीला दुर्धर आजार आहे. मुलांचा व पत्नीचा दवाखान्याचा खर्च करताना ते मेटाकुटीस आले आहेत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचा संसाराचा गाडा सुरू आहे. अशातच महापुराने संपूर्ण पिकच गेले. नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मिळत नाही. अधिकाऱ्यांनी आता माणुसकीच्या भावनेतून त्यांना मदत करण्याची गरज आहे. 


" मी पिक विम्यासाठी रितसर अर्ज व विमा रक्कम चलनाने भरली होती. महापुराने पीक गेल्यानंतर कृषी सहाय्यक रियाज पखाले यांनी शेतीमध्ये हजर राहून पंचनामा केला. परंतु विविध कारणे दाखवून मला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ अद्यापही दिलेला नाही" 
- शहाजी पाटील. शेतकरी, बानगे (ता.कागल) 

 
"शहाजी पाटील यांच्या प्रकरणाची चौकशी करून या शेतकऱ्यावर अन्याय झाला असल्यास या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.'' 
- अनिकेत माने, तालुका कृषी अधिकारी कागल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

Marathi News Live Updates :गौतमी पाटलांविरोधात भाजप नेत्या आक्रमक, अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT