कोल्हापूर

शेतकऱ्याने दिली ऑफर! ..तर राज्यकर्त्यांना एक एकर बागायत जमीन

गणेश शिंदे

काही दिवसांपासून एकरकमी एफआरपी देण्याबाबतची चर्चा ऊसपट्ट्यात सुरू आहेत.

जयसिंगपूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचा घाट घातला आहे. याविरोधात जो राजकारणी एकरकमी एफआरपीबाबत यशस्वी लढा देईल त्याला स्वतःची एक एकर बागायती जमीन बक्षीस देण्याची घोषणा नांदणी (ता. शिरोळ) येथील रामगोंडा पाटील या शेतकऱ्याने केली आहे.

पाटील हे नांदणी (ता. शिरोळ) येथील प्रगतशील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हेच काही वर्षापासून रस्त्यावरची लढाई करत आहेत. पण राज्यकर्त्यांकडून भ्रमनिरास होत असल्याने अखेर पाटील यांनी इतर राज्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आव्हान दिले आहे. त्यांची अठरा एकर बागायती जमीन आहे. त्यांच्याकडे उस, फ्लॉवरची शेती असते. ते गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.

काही दिवसांपासून एकरकमी एफआरपी देण्याबाबतची चर्चा ऊसपट्ट्यात सुरू आहेत. याविरोधात आंदोलनाची वज्रमूठ बांधण्याचे काम शेतकरी संघटनांकडून होत आहे. पण या धोरणाविरोधात कोणताही राजकारणी व्यक्ती बोलायला अथवा आंदोलन करण्यासाठी तयार नाही. यामुळे ऊस उत्पादकात प्रचंड नाराजी आहे. ऊस उत्पादकांच्या हक्काच्या दराला कात्री लागत असल्याने अर्थकारण कोलमडण्याची दाट शक्यता आहे. ही बाब कोणीच गांभीर्याने घेत नसल्याने पाटील यांनी उद्विग्नतेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.

घोषणेनंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कोणीही नेता याप्रश्नी रस्त्यावर उतरायला तयार नाही. धोरणकर्त्यांमध्ये कोणी वाली आहे की नाही? हाच प्रश्‍न आम्हाला निर्माण झाला आहे. त्यामुळेच विचारपूर्वक मी ही घोषणा केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT