farmer Jumped five hundred feet into the coupon line at belgaum raibag 
कोल्हापूर

बापरे ; पाण्यासाठी मारली पाचशे फूट कूपनलिकेत उडी

सकाळ वृत्तसेवा

रायबाग : खोदाई केलेल्या कूपनलिकेला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने त्याच ५०० फूट कूपनलिकेत उडी घेतली आहे. ही घटना आज (ता. ११) रायबाग तालुक्यातील सुलतानपूर येथे घडली. लकाप्पा दोडमनी असे उडी घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 'रेस्क्यू टीम'कडून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, तहसीलदार चंद्रकांत बजंत्री व अधिकारी सध्या घटनास्थळी आहेत. 
या बाबत अधिक माहिती अशी, लकाप्पा दोडमनी यांची पाऊण एकर जमीन आहे. या जमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी कर्ज काढून गेल्या गुरुवारी (ता. ७) पाचशे फूट खोल कूपनलिका खोदली आहे. मात्र तिला पाणी न लागल्याने चिंतेत असणाऱ्या लकाप्पा यांनी आज सकाळी दहा वाजता अंगावरील कपडे काढून थेट कूपनलिकेत उडी घेतली. ही माहिती ग्रामस्थांना समजताच एकच गर्दी झाली. रायबागचे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रकाश वड्डर, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी, हारुगेरीचे पोलिस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अग्निशामक दलासह  एसडीआरएफ टीमला पाचारण केले. तीन जेसीबीद्वारे कूपनलिकेच्या बाजूने खोदाई करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी सध्या पोहोचले आहेत. ते रेस्क्यू टीमसह अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. लकाप्पा हे कूपनलिकेत खालीपर्यंत गेलेले नाहीत. ते मध्यावर अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचून तात्काळ बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही वेळाने त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर पुढील नेमकी परिस्थिती समोर येणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

Pune Mumbai Journey : पुणे-मुंबई प्रवास आता ९० मिनिटांत! नवीन द्रुतगती मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी

New Year Upday 2026: नवीन वर्षात 'या' खास उपायांचे शांतपणे करा पालन, वर्षभर आर्थिक समस्यांचा करावा लागणार नाही सामना

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT