farmer new bill protest kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात शेतकरी विरोधी विध्येयकाची होळी 

farmer new bill protest kolhapur

कोल्हापूर  - "" संसदेत बनविलेली शेतकरी विरोधी विध्येयक रद्द करावीत या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती तर्फे येथील बिंदू चौकात विध्येयकांची प्रतीची होळी करण्यात आली. 

किसान संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक नामदेव गावडे म्हणाले की, "" थंडीच्या कडाक्‍यातही दिल्लीतील आंदोलनात राज्यातील व कोल्हापूरातील शेतकरी नेटाने सहभागी झाले. कोणत्याही संकटे झुगारून हे आंदोलन अभूतपूर्व होत आहे. तरीही केंद्र सरकारने विध्येयक माग घेतलेले नाही, म्हणून या विध्येयकाची होळी करीत आहोत. त्यासोबत वाढीव वीज बिलामुळे वीज ग्राहक हैराण झाल्याने वीज बिलांचीही होळी करीत आहोत.'' 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतिशचंद्र कांबळे म्हणाले की, "" सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कायदे स्थगित केले. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागणीचा पाझर फुटावा अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल याची दखल केंद्र सरकारने घ्यावी.'' 
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत यादव म्हणाले की, "" या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी व कामगारांची एकजूट झाली आहे. त्यामुळे आत्ता तरी सरकारने शहाने होऊन शेतकरी विरोधी विध्येयक मागे घ्यावे तसेच राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वीज विध्येयक मागे घ्यावे.'' 

यावेळी चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव, दादागिरी नही चलेगी नही चलेगी, अन्यायकारक शेतकरी विध्येयक मागे घ्या आदी घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण, रवी जाधव, डॉ. टी. एस. पाटील, शंकर कटाळे, कुमार जाधव, सुभाष सावंत, रमेश वडणेकर, मुकुंद वैद्य, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Kolhapur Land Fraud : मळवीवाडी जमीनप्रकरणी आरोपीची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी;शिक्का ताब्यात, वरिष्ठांनी घेतली माहिती

SCROLL FOR NEXT