कोल्हापूर

आता शेतकरी करणार सातबारावर पिकाची नोंद

१५ ऑगस्टपासून मोबाईल अॅप सुरू; कंदलगावात प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव (कोल्हापूर) : अनेक वर्षांपासून शेतीचे नुकसान अथवा पीक पाण्याची नोंद करण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांना हंगामातील अनेकदा ग्रामपंचायतमधील तलाठी कार्यालय गाठावे लागत असे. मात्र, शासनाने शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील पीकपाणी व नुकसान स्वतः नोंदवू शकणार आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी किसान योजनेला महत्त्व देत या मोबाईल अॅपची निर्मिती केल्याने शेतकऱ्यांचा पीकपाणी, नुकसान झालेली नोंद करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. हे अॅप १५ ऑगस्टपासून सुरू होणार असून, या संबंधीचे प्रशिक्षण गावपातळीवर सुरू आहे. कंदलगावमध्ये ग्रामदैवत अंबाबाई मंदिर येथे या अॅपचे प्रशिक्षण गावचे तलाठी प्रवीण उगलमुगले यांच्याकडून देण्यात आले. या वेळी सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच राजेंद्र निर्मळ, ग्रामपंचायत सर्व सदस्य, कृषी सहाय्यक, शेतकरी उपस्थित होते.

शेतीचे नुकसान, पिकांची नोंद करणे दरवर्षी जिकिरीचे होते. अनेकदा तलाठी कार्यालयातून कागदपत्रे, कमी माहितीमुळे परत जावे लागत होते. मोबाईलवरील या अॅपमुळे काही सेकंदात आपली माहिती आपल्या सातबाऱ्यावर नोंद करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे.

- हणमंत निर्मळ, शेतकरी

दरवर्षी पीकपाणी नोंदविण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत होते. शासनाच्या या मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहेच. त्याबरोबर योग्यवेळी सातबाऱ्यावर नोंद झाल्याने नुकसानही होणार नाही.

- साहिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे अॅप वरदान असून, सर्वांनी याबाबत माहिती घेऊन आपला वेळ वाचवावा, तसेच आपल्या पीक पाण्याची नोंद स्वतः केल्याने होणारा त्रासही कमी होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

- प्रवीण उगलमुगले, तलाठी, कंदलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT