Kolhapur farmer sakal
कोल्हापूर

Kolhapur : बनावट बियाण्यांचा फटका

कोपार्डेत शेतकऱ्यांचा आरोप; ३५ गुंठ्यांत भाताचे नुकसान

- कुंडलिक पाटील

कुडित्रे : कोपार्डेत बनावट बियाण्यांमुळे भाताचा ३५ गुंठ्यांचा प्लॉट खराब झाला. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरू आहेत. यामुळे तालुक्यात बोगस बियाण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कोपार्डेत हरी पाटील व रामचंद्र धोंडीराम पाटील यांची शेती आहे. यावर्षी पावसाळ्यात ३५ गुंठे भाताचे क्षेत्र केले. कोल्हापुरातील कृषी दुकानातून बियाणे घेतले. रोप लावण केल्यानंतर भात चांगले तरारले, खते व भांगलण वेळेत केली. यामुळे भाताची उंचीदेखील चांगली वाढली. मात्र भात टप्प्याटप्प्याने बाहेर पडले आहे.

भात पोसावताना ठिकठिकाणी, काही ठिकाणी बाहेर पडले. काही ठिकाणी बाहेर पडले नाही, यामुळे भेसळ बियाणे असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या प्लॉटमध्ये यापूर्वी त्यांना ४५ पोती भात अपेक्षित होते. मात्र भेसळ भात असल्यामुळे दहा पोतीसुद्धा भात मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत शेतकरी पाटील यांनी २८ सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले, मात्र त्यांनीही दाद घेतली नाही. दुकानदार व कंपनीकडून फक्त भेट दिली जाते. मात्र भरपाई दिली जात नाही. नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी करवीरतालुक्यात वाकरे येथे सूर्यफुलाचे बोगस बियाणे आढळले होते. यानंतर परिसरात हा दुसरा प्रकार घडला आहे.यामुळे बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भात बियाणे भेसळीचे आहे. वेगवेगळ्या जातींची बियाणे आहेत. यावेळी पाऊस चांगला झाला. मात्र खराब बियाण्यांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कंपनी, दुकानदार व कृषी विभाग दात देत नाही. म्हणून नुकसानभरपाई मिळावी.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT