The Farmer Was Frightened By The Tusker Elephant Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

टस्कर हत्तीच्या चित्काराने शेतकऱ्याची घाबरगुंडी

रणजित कालेकर

आजरा : चंदगडच्या सीमेवर वावरत असलेला टस्कर हत्ती पुन्हा आजरा तालुक्‍यात परतला आहे. टस्कराने एंरडोळ येथील शेतकरी शंकर आप्पा पाटील यांच्या शेतातील ऊस व केळी पिकाचे नुकसान केले आहे. तो दोन दिवसांपासून या परिसरात आला असून त्यांने चांगलाच धुडघुस घातला आहे. दरम्यान, टस्करच्या जोराच्या चित्काराने पाटील यांची घाबरगुंडी उडाली.

शंकर पाटील यांचे जंगलाजवळ कामत नावाचे शेत आहे. येथे त्यांनी छोटीसे घर बांधले आहे. या घरात ते राखणीसाठी काल रात्री (ता.9) गेले होते. मध्यरात्री जंगलाच्या दिशेन त्यांना टस्कराचे जोराचा चित्कार ऐकू आला. एक काळे मोठे धुड त्यांच्या घराजवळ आले. त्याच्या आवाजाने पाटील यांची घाबरगुंडी उडाली. टस्कराने ऊस पिकात घुसून सुमारे एक गुंठ्यातील पिक खावून व तुडवून टाकले.

घराजवळील देशी केळी उध्वस्त केली. या परिसरातील अन्य तीन चार शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचेही नुकसान केले आहे. सुमारे तीन तास टस्कर शेतात होता. कुत्री अंगावर धावून गेल्यावर टस्कराने जोरदार चित्कार केला. कुत्र्यांचे भुंकणे व बॅटरीचा प्रकाश झोत शेतकऱ्यांनी अंगावर टाकल्याने त्यांने जंगलाकडे कुच केली. टस्कर या परिसरात आल्याने रात्रीची राखणी बंद करावी लागणार असून यामुळे गव्याचे फावणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT