Farmer Work With Social Distance Kolhapur Marathi News
Farmer Work With Social Distance Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शेतात सोशल डिस्टन्सिंग

सकाळवृत्तसेवा

नेसरी : देशात कोरोना संसर्ग रोखणेसाठी देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत शेतीच्या कामात व्यस्त आहे. दोन सदस्यांमध्ये योग्य अंतर, तोंडाला मास्क, रूमाल बांधून बाहेरील मजूर न घेता कुटुंबातील मोजकेच सदस्य शेती कामे करताना दिसत आहेत.

घरामध्ये किती वेळ बसणार, शेतामध्ये हातातोंडाला आलेल्या पिकांकडे दुर्लक्ष केल्यास अडचणी येतील या कारणाने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेती कांमामध्ये गर्दी न करता योग्य खबरदारी घेऊन भांगलण, शेतीला पाणीपुरवठा, काजू झाडे स्वच्छता, औत कामे सुरू आहेत. शेती कांमाकरिता ट्रॅक्‍टर, जेसीबी, पाणीपुरवठा इंजिनसाठी पंपावरून डिझेल, पेट्रोल मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत, अशी तक्रार काही शेतकरी करत आहेत. 

याबाबत शेतकरी विलास नाईक म्हणाले, ""शेतीकामांसाठी पंपावरून डिझेल, पेट्रोलसाठी आडवणूक केली जात आहे. विनवणी करावी लागत असून शेतकरी वर्गाला तात्काळ डिझेल, पेट्रोल उपलब्ध करून द्यावे..'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT