Farmers Worry About Future Kolhapur Marathi news 
कोल्हापूर

राबणं तर सुरूच हाय, म्होरं काय व्हणार माहीत नाय! 

सुनील कोंडुसकर

चंदगड : कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना शेतकऱ्यांचं राबणं मात्र सुरूच आहे. ""शेतकऱ्याच्या नशिबातच राबणं हाय. उन्हाळी शेतीसाठी राबलो, खरिपासाठीही राबणार आहोत; परंतु पुढं काय होणार हे माहीत नाही.'' अशा आशयाचा सार्वत्रिक सूर शेतकऱ्यांतून ऐकायला मिळत आहे. कोरोनामुळे मिरची, भाजीपाला पिकाला बाजारपेठ न मिळाल्याने कोट्यवधी रुपयांचा शेतीमाल अक्षरशः जाग्यावर कुजून गेला. ही स्थिती सुधारण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, याची निश्‍चिती नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

सुरुवातीच्या काळात ऊस या बागायती पिकाला महत्त्व देणारा शेतकरी इतर पिकांकडे वळला. बेळगावसारखी मोठी बाजारपेठ असल्यामुळे भाजीपाला पिकाला मागणी आहे, हे त्यांच्या लक्षात आले. पार्ले, कळसगादे, हेरे, पाटणे, जेलुगडे, जंगमहट्टीपासून ते मजरे कार्वेच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकू लागला.

हॉटेलसाठी लागणारी हिरवी मिरची, बिनीस, फ्लॉवर, कोबी, बटाटा आदी पिकांचा समावेश होता. तीन ते चार महिन्यांच्या या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले. नदीवरून, विहिरीवर किंवा विंधन विहिरीवर आधारित पाईप लाईन, ठिबक सिंचन, जमिनीचे सपाटीकरण, अशी खास गुंतवणूक केली जाऊ लागली. उसात आंतरपीक म्हणूनही भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले. मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्‍टर, टेंपो व्यवसायांना चालना मिळाली. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच कोरोनामुळे शासनाने संचारबंदी जाहीर केली.

ती सातत्याने वाढत गेली. कष्टाने उत्पादित केलेले पीक डोळ्यादेखत कुजायला लागले. आंतरजिल्हा वाहतूक बंद झाल्यामुळे बेळगावसारखी मोठी बाजारपेठ असूनही उपयोग झाला नाही. दरवर्षी लाखो रुपये मिळवून देणारे पीक यावर्षी मातीमोल ठरले. काजू हे त्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक; परंतु यावर्षी अद्याप त्याचा दर जाहीर झाला नाही.

आता येणाऱ्या खरिपासाठी त्याची तयारी सुरू आहे. बांधबंधिस्ती, शेणखत टाकणे, नांगरणी, उसाला पाणी देणे यासारख्या कामात तो व्यस्त आहे. पाटातून पळणाऱ्या पाण्याबरोबर विचारांची गतीही धाव घेत आहे. येणारा हंगाम तरी आपल्याला लाभेल का, हीच त्याला चिंता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT